Fuel Price Hike file Photo
पुणे

Pune Fuel Price Hike: युद्धाचा फटका पुणेकरांच्या खिशाला; पेट्रोल-डिझेल-CNG दरवाढीने संताप

जागतिक कच्च्या तेल संकटाचा परिणाम; वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सरकारकडे दिलासाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आखाती देशात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे संकट गडद झाले आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट आणि तीव फटका आता पुणेकरांच्या खिशाला बसत आहे. पुण्यात नुकतीच पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून, पर्यावरणपूरक मानल्या जाणाऱ्या सीएनजीनेही ग््रााहकांना ‌‘गॅस‌’वर आणले आहे.

या अचानक झालेल्या दरवाढीमुळे पुणेकरांमधून तीव संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांशी दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने संवाद साधला असता हे युद्ध तातडीने थांबून जगावर ओढवलेले संकट थांबविण्याची मागणी केली.

जागतिक पातळीवरील युद्धाचे निमित्त असले, तरी देशांतर्गत पातळीवर इंधनावरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनाची आहे, अशीच भावना सध्या प्रत्येक पुणेकराच्या मनात आहे. आता यावर सरकार काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही रोज पिंपरी-चिंचवड ते पुणे, असा दुचाकीने प्रवास करतो. आधीच महिन्याचे बजेट हाताबाहेर गेले आहे. युद्ध तिथे होतेय आणि खिसा आमचा रिकामा होतोय. सरकारने वेळीच कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, नाहीतर दुचाकी घरात शोभेसाठी ठेवावी लागेल.
दिनेश शिंदे, दुचाकीस्वार
दिवसभर रिक्षा चालवून जेमतेम कमाई होते. त्यात सीएनजीचे दर वाढल्यामुळे रोजचा नफा कमालीचा घटला आहे. आरटीओच्या नियमानुसार आम्ही प्रवाशांकडून जास्त भाडे घेऊ शकत नाही. मात्र, या इंधन दरवाढीमुळे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो तातडीने सुटायला हवा.
अनंता वीर, रिक्षाचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT