Science Park Pune Pudhari
पुणे

Science Park Pune: पुणे जिल्हा परिषद उभारणार दोन सायन्स पार्क

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी उपक्रम; पाच गावांपैकी दोन ठिकाणांची निवड अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे दोन ठिकाणी सायन्स पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायन्स पार्कसाठी पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यातील दोन गावांतील जागा लवकरच निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

बंगळुरूच्या धर्तीवर एका फाउंडेशनच्या सहकार्याने हे सायन्स पार्क उभारले जाणार आहे. बारामती तालुक्यातील तांदुळवाडी, कऱ्हाटी, पुरंदर तालुक्यातील दिवे-झेंडेवाडी, खेड तालुक्यातील रासेड्ढगोसे आणि आळंदी जवळील गोळेगाव ही स्थळे प्राथमिक स्वरूपात निवडण्यात आली आहेत. यासाठी संबंधित ग््राामपंचायतींनी सायन्स पार्कसाठी जागा देण्याचे मान्यतेचे ठराव मंजूर केले आहेत. वाहतूक आणि इतर सोयी पाहून दोन जागा अंतिम निश्चित केल्या जातील. त्या ठिकाणी सायन्स पार्क उभारणीस सुरुवात केली जाणार आहे.

एका सायन्स पार्कसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या सायन्स पार्कसाठी पर्यावरणपूरक आणि मोजक्या इमारती असतील. यात सायन्स पार्कसंबंधित अनेक उपकरणे, सुसज्ज वाचनालय तसेच इतर वैज्ञानिक साहित्य मुलांना पाहता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत राहील, तर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्याचा विचार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू येथील सायन्स पार्कची पाहणी केली असून, त्यानुसार येथील पार्कची उभारणी केली जाणार आहे. याकरिता 10 ते 25 एकर जागा संपादन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होईल. वर्षभरात सायन्स पार्कची उभारणी पूर्ण करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

कृतीवर आधारित सायन्स पार्क

या सायन्स पार्कमध्ये जिल्ह्यातील दूरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिली पाच वर्षे सर्व व्यवस्था व देखभाल संबंधित फाउंडेशनकडून केली जाणार असून, त्यानंतर ते जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व वैज्ञानिक उपकरणे बसवली जातील, तर दुसऱ्या टप्प्यात तारांगण उभारले जाईल. कृतीवर आधारित पद्धतीने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक धडे देण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT