Pune Unauthorized Schools list Pudhari
पुणे

Pune Unauthorized Schools: पुण्यातील 45 शाळांवर कारवाईचा इशारा! पालकांनो, प्रवेश घेण्यापूर्वी ही यादी तपासा

Pune Unauthorized Schools: पुणे जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील 45 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांकडे शासनाची अंतिम मान्यता नसल्याने पालकांनी मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune Unauthorized Schools: पुणे जिल्ह्यातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 45 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून पालकांनी अशा शाळांमध्ये मुलांचे प्रवेश करु नयेत, असा इशारा दिला आहे.

या यादीमध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 21 शाळांचा, तर ग्रामीण भागातील 24 शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार, काही शाळांकडे शासनाची अधिकृत परवानगी नाही, काहींना केवळ हेतूपत्र मिळाले आहे पण अंतिम मान्यता नाही, तर काही शाळा मंजूर इमारतीऐवजी इतर ठिकाणी सुरू असल्याचं आढळून आलं आहे.

प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता तपासून घ्यावी.

पुणे शहरातील अनधिकृत शाळा (PMC)

  1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी

  2. महात्मा गांधी प्रशाला, संजय पार्क

  3. आकांक्षा अकादमी/शाळा, लोहेगाव

  4. TIMS तकवा इस्लामिक स्कूल आणि मकतब, कोंढवा

  5. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक

  6. इमॅन्युएल पब्लिक स्कूल, मोहम्मदवाडी रोड, हडपसर

  7. आर्यन स्कूल, मानाजीनगर

  8. लेगसी हायस्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक

  9. शिबिल नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक

  10. ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव बुद्रुक

  11. आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री

  12. एकारा इस्लामिक स्कूल, कौसरबाग, कोंढवा

पिंपरी चिंचवड शहर (PCMC)

  1. ब्लूमिंग बड्स स्कूल, ताथवडे

  2. लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर

  3. माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी

  4. डीएमके इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी

  5. माने इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी

  6. नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी चऱ्होली

  7. माइंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी चर्होई

  8. हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड

  9. कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा

पुणे ग्रामीण

  1. सेंट झेवियर्स स्कूल, भोर

  2. ओरिजिनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, सोरतापवाडी, हवेली

  3. न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल, सरडेवाडी, इंदापूर

  4. इरा पब्लिक स्कूल, इंदापूर

  5. अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, इंदापूर

  6. जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल, ठाकूरवस्ती (सोलू), खेड

  7. ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ, खेड

  8. ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी, खेड

  9. छत्रपती शिवाजी राजे विद्यालय, आळंदी, खेड

  10. सरस्वती विद्यालय, आळंदी, खेड

  11. हंपी डम्पी प्रीस्कूल, खेड

  12. येशू ख्रिस्त इंग्लिश मीडियम स्कूल, कामशेत, मावळ

  13. सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, नवलाख उंबरे, मावळ

  14. एंजेल हाई स्कूल, दत्तवाडी नेरे, मुळशी

  15. क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल, जांबे, मुळशी

  16. श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव, मुळशी

  17. चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय, पिरंगुट, मुळशी

  18. सरस्वती क्लासेस, पिरंगुट, मुळशी

  19. रोझलँड इंटरनॅशनल स्कूल, पिरंगुट, मुळशी

  20. एलिट इंटरनॅशनल स्कूल, कासारंबोली, मुळशी

  21. पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, मुळशी

  22. श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, मुळशी

  23. श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, वीर, पुरंदर

  24. सेंट चवरा शाळा, सरदवाडी, शिरूर

पालकांना प्रशासनाचा सल्ला

शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची सरकारी मान्यता, इमारत परवानगी आणि शिक्षण विभागाची नोंदणी तपासावी.

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, परीक्षा आणि मान्यतेसंदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT