सुभाष किवडे
पुणे : गेल्या आठवड्यात साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी तर नव्या नारळाच्या दरात शेकड्यामागे दोनशे रुपयांनी घट झाली. आवक वाढल्याने हलक्या गुळाच्या दरात तीनशे रुपयांनी घट झाली तर मागणीअभावी साखरेच्या दरात आणखी पन्नास रुपयांनी घसरण झाली. आंबेमोहोर तांदळाच्या दरातही मोठी घट झाल्याचे सांगण्यात आले.
साबुदाण्याचा नवा हंगाम सुरू झाला असून आवक मुबलक प्रमाणात होत आहे. सध्या मागणी कमी असल्याने दर मंदीकडे झुकले आहेत. गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घट झाली. भगरीचे दर मात्र स्थिर आहेत. शेंगदाण्याची आवक-जावक साधारण असून दर स्थिर होते. गोटा खोबरे दरातील तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.
नवा नारळाच्या दरात आणखी घट
सध्या कोणतेही सण उत्सव नसल्याने हलक्या प्रतीच्या नव्या नारळास उठाव कमी आहे. या नारळाचे दर उत्पादन केंद्रातही घसरले आहेत. परिणामी, पुण्याच्या घाऊक बाजारात गेल्या आठवडयातही नव्या नारळाच्या दरात शेकडयामागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. मात्र जुन्या नारळास हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. लवकरच नवा हंगाम सुरू होणार आहे. उंच दरात मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाच्या दरात मोठी घसरण झाली. क्विंटलचा दर 15 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंत उतरल्याचे सांगण्यात आले. आवक जावक कमी असल्यामुळे गहू, ज्वारी तसेच बाजरीचे दर स्थिर होते. मागणी कमी असल्याने शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेले आणि वनस्पती तुपाचे दर टिकून होते. खोबरेल तेलाचे दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4075-4100 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2375-2475, रिफाईंड तेल 2150-2750, सरकी तेल 2075-2375, सोयाबीन तेल 1900-2125, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2075- 2250, खोबरेल तेल 6000 वनस्पती 1830-2080 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000- 11500, आंबेमोहोर (सुवासिक) 15000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार
9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5500-5800, गावरान नं.2 4800-5000, नं.3 3500-3800, दूरी नं.1 3600-4000, दूरी नं. 2 3200-3500 रु बाजरी:- महिको नं.1 3700-3800, महिको नं.2 3300-3500, गावरान 3500-3600, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्स्ट्रा 4550-4650, गूळ नं. 1 4350-4500, गूळ नं.2 4150-4250 गूळ नं.3 400- 4100, नं. 4 - 3700-3900, बॉक्स पॅकिंग 3900-5100 रु. डाळी:- तूरडाळ 9500-11000, हरभराडाळ 7100-7200, मूगडाळ 9700-9700, मसूरडाळ 7400- 7500, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-10400 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9500, मसूर 6900-7000, मूग 9000-9200, मटकी गावरान 12000, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 8100-9600, स्पॅनिश9800-10000, घुंगरु 8800-9000 टीजे 8000 रु. धने :- गावरान 8000-9000, इंदूर 11000-15000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2400-2600, मद्रास 4700-5000, पालकोल जुना 3100- 3200, सापसोल 4500-5300 रु.
दरातील घट कायम
चालू महिन्याकरिता कोटा अपुरा देण्यात आला आहे, यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दिवाळीनंतर साखरेस मागणी कमी असल्याने दरातील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी घट झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4 हजार 75 ते 4 हजार 100 रुपये होता. गुळाचा नवीन हंगाम सुरू झाला असून दौंड भागातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या कोणतेही सण, उत्सव नसल्याने गुळास मागणी साधारण आहे. दौंड भागतील गुळाची प्रत हलकी आहे. या गुळास उठाव कमी असल्यामुळे क्विंटलमागे दरात तीनशे रुपयांनी घट झाली. मात्र कराड भागातील भारी गुळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.