Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील अनेक भागांत आज ५ तास पाणीपुरवठा बंद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील ५०० एमएलडी टाकीच्या दुरुस्तीचे काम; गुरुवारीही कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठ्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटरक्षमतेच्या टाकीची अत्यावश्यक दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा आज बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) दुपारी २ ते सायंकाळी ७ या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, संबंधित परिसरात गुरुवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे एसएनडीटी (एमएलआर) जलवाहिनीवरील विधी महाविद्यालय रस्ता, पौड रस्ता, शीलाविहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावीवस्ती, करिष्मा सोसायटीसमोरील परिसर, बिग बाझार परिसर, बंधन सोसायटी, डी. पी. रस्त्याचा काही भाग, मयूर कॉलनी, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता, झाला सोसायटी ते शिवाजी पुतळा परिसर, एरंडवणा, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत ते म्हात्रे पूल, एच. ए. कॉलनी, टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर परिसर, सुनीता सोसायटी, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट, मंगेशकर हॉस्पिटल परिसर, हिमाली सोसायटी, वकीलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजाशंकर, नवसह्याद्री सोसायटी, ताथवडे उद्यान परिसर, नीलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा, स्थैर्य, मधुसंचय, शैलेश, अलंकार, मनीषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, जयशक्ती सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच चतुःशृंगी टाकीच्या कार्यक्षेत्रातील औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी तसेच औंधगाव परिसरालाही या पाणी बंदचा फटका बसणार आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT