Pune Water Crisis Pudhari
पुणे

Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाई तीव्र; अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात नागरिक रस्त्यावर

कसबा पेठ ते मुंढवा परिसरात संताप; टँकरअभावी नागरिकांची गैरसोय, प्रशासनाविरोधात आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कसबा पेठ: गेल्या काही दिवसांपासून कसबा गणपती चौक ते पवळे चौक परिसरात अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. शनिवारी पाणीटंचाईची पाहणी करण्यासाठी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलांनी घेराव घातला. पाणीकपात सुरू झाल्यापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

जून महिना अर्धा संपला, तरी अद्यापही पाऊस सुरू झाला नसल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. यामुळे महापालिकेने शहर आणि उपनगरांत पाणीकपात सुरू केली असून, सम आणि विषम तारखेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये संध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. कसबा पेठेत अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलांनी सांगितले की, पूर्वी कमी दाबाने का होईना पाणी येत होते. मात्र, पाणीकपात सुरू झाल्यापासून आम्हाला पाणीच मिळत नाही. वणवण करीत सार्वजनिक नळांवरून पाणी भरावे लागत आहे. पाणी भरण्यातच दिवस जात असल्याने कामाला देखील जाता येत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापुढे सम तारखांना सर्व पेठांच्या परिसरात, तर विषम तारखांना शास्त्री रोड ते गरवारे कॉलेज परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेमार्फत तातडीने पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ताडीवाला रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ शनिवारी जहांगीर चौकात महिला आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

भीम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ताडीवाला रोड परिसरात मागील काही दिवसांपासून अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी केला. आंदोलकांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. जहांगीर चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने आंदोलनाचा परिणाम पुणे स्टेशन, ससून रुग्णालय, आरटीओ रस्ता, वाडिया चौक आणि ढोले पाटील रस्ता परिसरातील वाहतुकीवर झाल्याचे चित्र दिसून आले. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश हरीहर यांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी नीलेश गायकवाड, प्रसाद मुदालू, रामा सूर्यवंशी, मंगल गायकवाड, शीला वाघमारे, सविता पालके, मल्लावा गायकवाड यांच्यासह महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

येरवडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी त्यांना महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, टँकर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते टँकरसाठी प्रशासनावर दबाव टाकत असल्याने गरज असलेल्या भागांत पाणी मिळत नसल्याचा आरोपही रहिवाशांकडून केला जात आहे. येरवडा, लक्ष्मीनगर, गुंजन चौक आणि आळंदी रस्ता परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. या भागात वडगाव शेरी पंपिंग स्टेशनवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत टँकरसंख्या अपुरी आहे. तसेच, टँकर वेळेत मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार टँकर ठरावीक भागाकडे पाठविले जात आहेत. परिणामी, गरज असलेल्या भागातील नागरिकांना टँकरची तासन्‌ तास प्रतीक्षा करावी लागत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, टँकर वाटपासाठी विविध स्तरांतून दबाव येत आहे.

हॉटेलमध्येही पाण्याचा अभाव

गुंजन टॉकीज परिसरातील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा होत नसल्याने हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंढवा, घोरपडी, केशवनगर परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून महापालिकेकडून सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीकपातीमुळे या भागात अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठीही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अनेक लहान-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे. सम-विषम पद्धतीनुसार पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी केवळ आश्वासने देत असल्याचा आरोपही रहिवाशांकडून केला जात आहे.

ताडीवाला रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ शनिवारी जहांगीर चौकात महिला आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

भीम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ताडीवाला रोड परिसरात मागील काही दिवसांपासून अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी केला. आंदोलकांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. जहांगीर चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने आंदोलनाचा परिणाम पुणे स्टेशन, ससून रुग्णालय, आरटीओ रस्ता, वाडिया चौक आणि ढोले पाटील रस्ता परिसरातील वाहतुकीवर झाल्याचे चित्र दिसून आले. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश हरीहर यांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी नीलेश गायकवाड, प्रसाद मुदालू, रामा सूर्यवंशी, मंगल गायकवाड, शीला वाघमारे, सविता पालके, मल्लावा गायकवाड यांच्यासह महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

येरवडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी त्यांना महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, टँकर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते टँकरसाठी प्रशासनावर दबाव टाकत असल्याने गरज असलेल्या भागांत पाणी मिळत नसल्याचा आरोपही रहिवाशांकडून केला जात आहे.

येरवडा, लक्ष्मीनगर, गुंजन चौक आणि आळंदी रस्ता परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. या भागात वडगाव शेरी पंपिंग स्टेशनवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत टँकरसंख्या अपुरी आहे. तसेच, टँकर वेळेत मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार टँकर ठरावीक भागाकडे पाठविले जात आहेत. परिणामी, गरज असलेल्या भागातील नागरिकांना टँकरची तासन्‌ तास प्रतीक्षा करावी लागत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, टँकर वाटपासाठी विविध स्तरांतून दबाव येत आहे.

मुंढवा परिसरात विषम तारखांना पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र, त्या दिवशीही अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.
धैर्यशील गायकवाड, रहिवासी, मुंढवा
पाणीकपात सुरू झाल्यापासून घोरपडी परिसरातील काही भागांमध्ये अजिबातच पाणी येत नाही. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही.
दादा गायकवाड, रहिवासी, भीमनगर
पाणीपुरवठा विभागाकडे चार टँकरची मागणी केल्यानंतर केवळ एकच टँकर मिळत आहे. तो देखील सकाळी मागणी केल्यास संध्याकाळी मिळत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपायायोजना करणे गरजेचे आहे.
अश्विनी लांडगे, स्थानिक नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT