पुणे: महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी 12 जागांवर फक्त भाजपचेच अर्ज आले असून, एका ठिकाणी प्रभाग समितीला फक्त काँग््रेासचा अर्ज आल्याने 13 जागांवरील अध्यक्ष बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे, तर दोन प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
15 प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी दि. 21 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात तब्बल 12 प्रभाग समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे बहुमत असल्याने भाजपवगळता अन्य पक्षांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे या सर्व ठिकाणी भाजपचे अध्यक्ष बिनविरोध होणार आहेत, तर वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग््रेासचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणची निवडणूक बिनविरोध होणार आहे. याशिवाय ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयासाठी भाजपच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीच्या सुरेखा कवडे, तर काँग््रेासकडून वैशाली भालेराव यांनी अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय येरवडा, वडगाव शेरी कार्यालयासाठी भाजपच्या कविता गलांडे व काँग््रेासचे विशाल मलके यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट आहे.
क्षेत्रीय कार्यालये व अध्यक्षपदाचे उमेदवार
1) नगर रोड-वाघोली - अनिल सातव (भाजप)
2) येरवडा-वडगाव शेरी - कविता गलांडे (भाजप), विशाल मलके (कॉंग््रेास)
3) ढोले पाटील रोड - सुरेखा कवडे, राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष, वैशाली भालेराव (कॉंग््रेास)
4) छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड - अमृता म्हेत्रे (भाजप)
5) औंध-बाणेर- रोहिणी चिमटे (भाजप)
6) कोथरूड-बावधन - वासंती जाधव (भाजप)
7) वारजे-कर्वेनगर - मंजुश्री खर्डेकर (भाजप)
8) सिंहगड रोड - सचिन मोरे (भाजप)
9) धनकवडी-कात्रज-आंबेगाव - प्रतिभा चोरगे (भाजप)
10) कोंढवा -उंड्री - रंजना टिळेकर (भाजप)
11) हडपसर-मांजरी - प्रशांत ऊर्फ मामा तुपे (भाजप)
12) वानवडी- साहिल केदारी (कॉंग््रेास)
13) बिबवेवाडी- मनीषा चोरबेले (भाजप)
14) कसबा पेठ- उज्ज्वला यादव (भाजप)
15) विश्रामबागवाडा- राघवेंद्र मानकर (भाजप)