पुणे: महापालिकेने शहरातील गरीब रुग्णांसाठी राबविण्यात येणारी ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने ओळखली जाणार आहे. या योजनेचे नाव बदलून ‘स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना’ असे करण्यात आले आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही घोषणा केली.
अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री होते. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकासकामांना किंवा योजनांना त्यांचे नाव मिळावे, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. महापालिकेच्या वतीने राबवली जाणारी शहरी-गरीब आरोग्य योजनेला अजित पवारांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग््रेासने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबतचे पत्र विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांना दिले होते. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. याबद्दल माहिती देताना भिमाले म्हणाले, शहरी गरीब योजनेचे ‘स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना’ असे नामकरण करण्यात येत आहे.
या योजनेचा सविस्तर फेरआढावा घेऊन ती अधिक सक्षम करण्यात येईल. योजनेतील त्रुटी दूर करून नव्याने काही आजारांचा समावेश करून अर्थसाह्य दिले जाईल. कर्करोगावरील उपचार आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग््रास्त रुग्णांना डायलिसिस उपचारांवरील मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल.
योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना दोन लाख रुपये
गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी 2009 पासून ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत हजारो नागरिकांवर आरोग्य उपचार झाले आहेत. स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग््रेासच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत सध्या आपण वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपये असलेल्या पुणेकरांना एक लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच, कॅन्सर रुग्णांसाठीही मर्यादा दोन लाख रुपये आहे.