पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांनी पात्रतेची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून निर्धारित वेळेपेक्षा अधिक आठ दिवस मुदतवाढ देण्यात यावी.
तसेच संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. सगळीकडे ओला दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जी काही अमानवीय शुल्कवाढ केली आहे ती तत्काळ रद्द करावी, अन्यथा तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी दिला आहे. (Latest Pune News)
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने परिक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विद्यापीठाने शुल्कवाढ केली आहे. ही शुल्कवाढ अन्यायकारक आहे. तसेच अनेक महाविद्यालयांनी इलिजिबिलिटीची प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
म्हणून निर्धारित वेळेपेक्षा अधिक आठ दिवस मुदत वाढ देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्या राज्यात सर्वत्र ओला दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये जी काही अमानवीय शुल्कवाढ केली आहे ती तत्काळ रद्द करावी असे देखील समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने शुल्कवाढ रद्द करणे तसेच परिक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती करणारे पत्र शांततेच्या व संविधानिक मार्गाने देण्यात आले आहे. आमची मागणी आहे की, विद्यापीठ प्रशासनाने झालेली शुल्कवाढ तत्काळ रद्द करावी व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.- अभिषेक शेलार, सदस्य, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती