Scholarship Pudhari
पुणे

Pune Scholarship Pending Applications: पुणे विद्यापीठात शिष्यवृत्तीचा खोळंबा; 12,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

महाविद्यालयांना तत्काळ अर्जांची पडताळणी पूर्ण करून शून्य प्रलंबित करण्याचे विद्यापीठाचे सक्त आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील 2019-20 ते 2025-26 दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी देण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्तींचे तब्बल साडेबारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्‌‍याच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे केवळ 2025-26 या एका वर्षातील साधारण साडेसात हजारांवर अर्ज प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिष्यवृत्ती अर्जांच्या पडताळणीत होणाऱ्या दिरंगाईवर लगाम घालण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना सक्त सूचना दिल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जावर रोजच्या रोज कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्‌‍याचा लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून तत्काळ स्क्रूटिनी करून शून्य प्रलंबित करणे आवश्यक आहे.

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रती महाविद्यालयात जमा केल्या नाहीत, यामुळे सर्व महाविद्यालय / संस्था, विद्यापीठ यांनी त्यांच्या स्तरावर सर्व ऑनलाईन अर्ज प्रलंबित ठेवले असतील, तर असे कोणत्याही महाविद्यालय, संस्थेने करू नये.

त्यांचे सर्व प्रलंबित ऑनलाईन अर्ज स्क्रूटीनी करून मंजुरीसाठी पुढे पाठवावे, तसेच कोणत्याही महाविद्यालयास विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रती जमा न केल्यामुळे स्क्रूटीनी करण्यासाठी समस्या असेल, तर त्याबाबत सहसंचालक कार्यालय व उच्च शिक्षण संचालनालयास सविस्तर कारणासह पत्राद्वारे तत्काळ कळवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्थांनी अर्जांच्या तपासणीसाठी कार्यशाळा आयोजित करून एकही ऑनलाईन अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे देखील विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT