SPPU Pudhari
पुणे

Pune University Girls Hostel Case: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांची घुसखोरी; गुन्हा दाखल

रात्री अकराच्या सुमारास प्रवेश; सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रमोद राठोड, ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षक संपत पाटील (वय ५१) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

११ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी विद्यार्थी मुलींच्या वसतिगृहात शिरले. मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी आहे. रात्रीच्या वेळी दोघे जण बेकायदा मुलींच्या वसतिगृहात शिरले.

आरोपींनी मुलींच्या वसतिगृहात घुसखोरी केली, असे सुरक्षारक्षक पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (१) (बेकायदा प्रवेश करून धमकावणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT