Heatwave Alert Pudhari
पुणे

Pune Temperature 43 Degree: पुण्यात 43 अंशांचा पारा; लोहगाव-कोरेगाव पार्कमध्ये उष्णतेचा उच्चांक

उष्णतेची लाट कायम; तज्ज्ञांकडून नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील लोहगाव आणि कोरेगाव पार्कचा पारा रविवारी 43 अंश सेल्सिअसवर गेल्याने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. एप्रिलमध्ये या आधी चार वेळा पारा 43 अंशांवर गेला आहे.

तसेच, 30 एप्रिल 1897 मध्ये शहराचा पारा 44.4 अंशांवर गेला होता, तो विक्रम अजूनही अबाधित आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना काळजी घ्या, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात सतत कमाल तापमानात मोठी वाढ होत असून, रविवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यंदा पारा 44 ते 45 अंशांवर जाईल, असे उकाड्यावरून जाणवत आहे. अजून एप्रिलचे पाच दिवस आणि संपूर्ण मे महिना बाकी आहे.

त्यामुळे शहरात दुपारी 12 ते 5 पर्यंत फिरताना काळजी घ्यावी. टोपी, गॉगल, पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडा. जास्त वेळ उन्हात फिरू नका. थोड्या अंतराने थांबा, मग पुढे जा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी या उष्णतेच्या लाटेमुळे दिला आहे.

तज्ज्ञांनी व्यक्त केलेली महत्त्वाची निरीक्षणे

  • शहराचे तापमान एप्रिलमध्ये 43 अंशांवर फार कमी वेळा गेले आहे. गत आठ ते दहा वर्षांत वाहन प्रदूषण, सिमेंटचे रस्ते, दाट वस्ती यामुळे तापमानात वाढ.

  • लोहगाव, कोरेगाव पार्क हे भाग उष्णतेची बेटं झाली आहेत. काचेच्या इमारती, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, दाट वस्ती यामुळे उष्णता वर न जाता त्याच ठिकाणी थांबते. त्यामुळे या भागात तापमान जास्त आहे.

  • 2020 ते 2026 वारंवार उष्णतेच्या लाटा.

  • 2025 हे वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले. त्या वर्षी सतत 43 दिवस उष्णतेची लाट सक्रिय होती.

  • यंदाही उष्णतेची लाट संपूर्ण मार्च आणि एप्रिलमध्येही सक्रिय असून, पारा सतत 41 अंशांवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT