Sugar  Pudhari
पुणे

Pune Sugar Prices: साखरेचा दर ७२ वरून थेट ५७ रुपयांवर! केंद्राच्या नव्या नियमांचा पुणे बाजारावर मोठा परिणाम

नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच कारखान्यांकडून साखर विक्रीचे बंधन; गुळाचे भावही उतरले, श्रावणामुळे साबुदाणा-भगर-नारळ मात्र तेजीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारने कारखान्यांकडून साखर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. तसेच, नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच साखर विक्री करण्याचे बंधन कारखान्यांवर घातले आहे. या निर्णयामुळे साखर बाजारावर नियंत्रण आले असून, दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात किलोमागे ७२ रुपयांपर्यंत पोहोचलेला साखरेचा दर शनिवारी ५७ रुपयांपर्यंत खाली आला.

साखरेच्या दरातील घसरणीचा परिणाम गुळावरही झाला असून, गुळाच्या भावात किलोमागे सात ते आठ रुपयांची घट झाली आहे. आगामी कृष्णजन्माष्टमी आणि गणेशोत्सवामुळे गुळाला मागणी वाढण्याची शक्यता असून, सध्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. बाजारात स्पॅनिश शेंगदाण्याच्या नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. महिनाभरात गुजरातमधूनही नवीन शेंगदाण्याची आवक सुरू होईल. श्रावणामुळे शेंगदाण्यासह साबुदाणा, भगर आणि नारळाला चांगली मागणी असल्याने त्यांचे दर तेजीत आहेत. आटा, रवा, मैदा आणि बेसनाच्या भावातही वाढ झाली आहे. आवक कमी पडल्याने पांढऱ्या वाटाण्याच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली. रिमझिम पावसामुळे मिरचीचा बाजार मात्र थंडावला असून, उर्वरित अन्नधान्यांचे दर स्थिर आहेत.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ५५००-५७०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) : - शेंगदाणा तेल २६५०-२९५०, रिफाईंड तेल २५००-३२००, सरकी तेल २५५०-२९५०, सोयाबीन तेल २२००-२५००, पामतेल २१००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २४००-२६५०, खोबरेल तेल ४२००, वनस्पती २२००-२६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४४००-४६००, मसुरी ३३००-३४५०, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७०००, लचकारी कोलम ७०००-७५००, चिन्नौर ७२००-७४००, ११२१-१००००-११०००, आंबेमोहोर (सुवासिक) १८०००-२००००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार १००००-११०००, बासमती तिबार ११०००-१२०००, बासमती मोगरा ६५००-७५००, बासमती कणी ४०००-५०००, इंद्रायणी ६०००-७०००रु.

गहू - लोकवन नं. १ ४३००-४५००, लोकवन नं. २ ३८००-४०००, नं.३ ३६००-३८००, सिहोर नं. १ ६५००-६८००, सिहोरी ५८००-६०००, मिलबर ३१०० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ६३००-६५००, गावरान नं.२ ५८००-६०००, नं.३ ५५००-५७००, दूरी नं.१ ३६००-३८००, दूरी नं. २ ३४००-३६०० रु बाजरी :- महिको नं.१ ३५००-३८००, महिको नं.२ ३२००-३४००, गावरान ३१५०-३२००, हायब्रीड ३०००-३०५०रु.गूळ :- गूळ नं. १ ५८०० ते ६१००, गूळ नं.२ ५५०० ते ५७००, गूळ नं.३ ५१०० ते ५३००, बॉक्स पॅकिंग ५५०० ते ६८०० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१३०००, हरभराडाळ ७५००-८०००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७७००, मटकीडाळ ९७००-१००००, उडीदडाळ १००००-१३००० रु. कडधान्ये:-हरभरा ७२००-७५००, हुलगा ६८००-७०००, चवळी ८०००-१००००, मसूर ६८००-७०००, मूग ८८००-९५००, मटकी गावरान १३०००-१४०००, मटकी पॉलिश ८५००-९०००, मटकी गुजरात ९०००-९५००, मटकी राजस्थान ९०००-९५००, मटकी सेलम १८०००-१८५००, वाटाणा हिरवा ५०००-५५००, वाटाणा पांढरा ५१००-५५००, काबुली चणा ७५००-११००० रु.

साबुदाणा :-साबुदाणा नं. १ ८५००, साबुदाणा नं.२ ८३००, साबुदाणा नं.३ ८००० रु. वरई भगर :-२१५००, सावा भगर २००००रु. गोटा खोबरे ३५०००-४०००० रु. शेंगदाणा :- जाडा १२०००-१२६००, स्पॅनिश १३८००-१५३००, घुंगरु १३०००-१४२००. धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७०००, इंदुर सुपर २५०००-३००००रु. पोहे :- मध्य प्रदेश ४८००-५२००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४९००-५१००, दगडी पोहा ४७००-५१००, पातळ पोहा ५६००-६२००, सुपर पोहा ५२००-५५००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६२५-७२५, भाजके डाळे ३५००-४०००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५९०-६००, भडंग ९००-१२००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १८००-१८५०, रवा १८००-१८५०, मैदा १७५०-१८५०, बेसन :- (५० किलोस) ४५००-४८०० रु. मिरची : काश्मीरी ढब्बी ६७५००-७२५००, ब्याडगी ३५०००-४००००, लवंगी तेजा २३५००-२५०००, गुंटूर २९०००-३००००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव) : नवा पॅकिंग २४००-२६००, मद्रास ४२००-४४००, पालकोल जुना २६५०-२८००, सापसोल ३२००-४८०० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT