Pune Dahihandi Festival: पुण्यात दहीहंडीचा जल्लोष ‘सेलिब्रिटीमय’; कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सचा जलवा

नम्रता संभेराव, सायली संजीव, अक्षरा देवधर यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती; तरुणाईत उत्सुकता
Dahihandi
DahihandiPudhari
Published on
Updated on

पुणे: ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार आणि त्यात लोकप्रिय कलाकारांची मंचावर होणारी एंट्री... यंदाच्या दहीहंडी उत्सवाची रंगत काहीशी 'सेलिब्रिटीमय' होणार आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा जलवा यंदा पुण्यातील उत्सवांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीचे कलाकार आणि डिजिटलविश्वातील लोकप्रिय चेहरे उत्सवात उपस्थित राहावेत, यासाठी आयोजकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Dahihandi
Himalayan Glaciers: हिमालयातील हिमनद्या का वितळताहेत? पुण्याचे हवामानतज्ज्ञ शोधणार ‘काळ्या कार्बन’चे गूढ!

शहरासह उपनगरांतही दहीहंडी उत्सवांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून, त्यात सेलिब्रिटींची उपस्थिती हाही ट्रेंड बनला आहे. पुण्यातील मध्यवर्ती पेठांसह छत्रपती शिवाजीनगर, कोथरूड, सहकारनगर, वारजे, बावधन, धायरी, आंबेगाव, हडपसर, विमाननगर आदी ठिकाणी कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, फेसबुक आदी माध्यमांवर लोकप्रिय असलेल्या इन्फ्लुएन्सर्सच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची प्रसिद्धी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

Dahihandi
Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरतीतील वयोमर्यादा हटली; नववी ते बारावीच्या उमेदवारांना मोठा दिलासा!

सेलिब्रिटी मॅनेजमेंट पाहणारे लक्ष्मीकांत गुंड म्हणाले, ''मुंबईतील दहीहंडी उत्सवांमध्ये सेलिब्रिटींची उपस्थिती असतेच; मात्र आता हा ट्रेंड पुण्यातही वेगाने वाढत आहे. यंदा मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार, नृत्य कलाकार तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्याला आयोजकांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातही महिला कलाकारांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरत आहे. मराठी कलाकारांचे मानधन साधारणपणे एक ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे. दहीहंडीच्या एक-दोन दिवस आधीही अनेक कार्यक्रमांमधील कलाकारांची नावे अंतिम केली जातात. त्यामुळे आगामी काही दिवसांत आणखी कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.''

Dahihandi
Pune Potholes: डांबरी मिश्रणाचा तुटवडा; पुण्यातील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला ‘ब्रेक’!

या कलाकारांचा असेल बोलबाला

पुण्यात यंदा मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यात नम्रता संभेराव, सायली संजीव, अक्षरा देवधर, प्रसाद खांडेकर, श्रुती मराठे, स्मिता गोंदकर असे विविध प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत. काही कलाकारांचे कार्यक्रम निश्चित झाले असून, काही कलाकारांच्या उपस्थितीबाबत आयोजकांकडून चर्चा सुरू आहे.

Dahihandi
Pune Dengue Cases: डेंग्यूचा वाढता धोका; पण पुण्यात सरसकट धूर फवारणी नाही! महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

दहीहंडी उत्सवामध्ये सिनेतारकांची उपस्थिती, हा पुणेकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. विशेषतः तरुणाईमध्ये कलाकारांविषयी मोठी उत्सुकता असते. यंदा शारदा-गजानन दहीहंडी उत्सव मंडळाच्या वतीने सिनेअभिनेत्री सई मांजरेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण आणखी वाढणार आहे. दहीहंडीचा पारंपरिक उत्साह, गोविंदा पथकांचा थरार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, यामुळे मार्केट यार्ड परिसरात उत्सवाचे जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण होईल.

सागर भोसले, कार्यकर्ता, शारदा-गजानन दहीहंडी उत्सव मंडळ, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news