Pune Fish Market Prices: श्रावणाचा परिणाम! पुण्यात मासळी, चिकन-मटणाची मागणी घटली; इंग्लिश अंडी मात्र महागली

गणेश पेठ मासळी बाजारात किनारपट्टीवरील मासळीची आवक कायम; मागणी कमी असल्याने मासळी, चिकन आणि मटणाचे दर स्थिर
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात दाखल होत आहे. श्रावण महिना सुरू असल्याने मासळीसह चिकन, मटण आणि अंडींना मागणी कमी आहे. बाजारात होत असलेल्या मागणीवरून व्यापारीवर्ग मासळी मागवीत आहे. मागणी आणि पुरवठा याच्या समतोलामुळे मासळीसह मटण आणि चिकनचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. तर इंग्लिश अंडींच्या दरात शेकड्या मागे २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.

Fish
Hinjewadi Shivajinagar Metro: उद्घाटनाच्या मुहूर्तासाठी हिंजवडी मेट्रो रखडली; १२ स्थानके तयार, सीएमआरएसची मंजुरीही मिळाली

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ३०) खोल समुद्रातील मासळी ५ ते १० टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ५ ते १० टन इतकी आवक झाली.

Fish
Pune Crime: गर्भलिंग निदान प्रकरणात ‘लाच’खोरीचा पर्दाफाश; १५ लाखांसाठी दोन पोलिस हवालदारांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ९००-९००, भिला : ५००-६००, हलवा : ८००-९००, सुरमई ७००-९००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-३५०, भिंग : ३००-४००, पाला : ८००-१२००, वाम : ६००-८००, ओले बोंबील : २००-३००.

Fish
Pune Dahihandi Festival: पुण्यात दहीहंडीचा जल्लोष ‘सेलिब्रिटीमय’; कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सचा जलवा

कोळंबी : लहान : २५०-३५०, मोठी : ३५०-४५०, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ६००-७००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : ३००-४००, मांदेली : २००-२५०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्‍या : ५००-६००. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, तांबोशी : ४००-५००, पालू : २५०-३००, लेपा : ३००-५००, बांगडा : २००-३००, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १५०-२००, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १००-१५० तारली : २००.

Fish
Himalayan Glaciers: हिमालयातील हिमनद्या का वितळताहेत? पुण्याचे हवामानतज्ज्ञ शोधणार ‘काळ्या कार्बन’चे गूढ!

नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२५०, मरळ : ३००-३५०, शिवडा : २००-२२०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१५०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २००, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११०० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५५०, डझन ८४, प्रतिनग ७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news