Stalking Pudhari
पुणे

Pune Crime: लग्नास नकार; तरुणीचा पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी

पुण्यात धक्कादायक प्रकार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तरुणीने लग्नासाठी नाही म्हटल्याचा राग मनात धरून तरुणीचा पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिला, ‌‘तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही,‌’ अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला. जानेवारी 2026 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली.

‌‘जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,‌’ अशी धमकी त्याने दिली. तसेच, आरोपीने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली असून, वारंवार फोन करून तिचा छळ केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT