पुणे: नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिवे येथील कार्यालयात फिटनेस तपासणीचे काम दर रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेची सुरुवात उद्या रविवारी ( दि. २८) सकाळी ८ पासून होणार असून, पहिल्याच दिवशी तब्बल १२० स्कूल बसच्या फिटनेस तपासणीचा मोठा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बसचालकांना यासाठी आगाऊ अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा, ही आमची प्राथमिकता आहे. शाळा सुरू झाल्यामुळे स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे. शालेय व्यवस्थापन आणि बसचालकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही दर रविवारी दिवे येथील कार्यालय सुरू ठेवून १२० वाहनांचा कोटा उपलब्ध करून दिला आहे. सर्वांनी आपल्या स्कूल बसची वेळेत फिटनेस तपासणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे