Automated Testing Station RTO Pudhari
पुणे

Pune Automated Testing Station RTO: पुणे आरटीओचे ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन सज्ज; आता फक्त फिट वाहनेच रस्त्यावर

ब्रेक, इंजिन, लाईट्सची संगणकीय तपासणी; तीन ठिकाणी ऑटोमॅटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारणी अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रस्त्यावरील वाढते अपघात आणि तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या दुर्घटनांना लगाम घालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) चे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच ही सुविधा वाहनधारकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे आता केवळ तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असलेली वाहनेच रस्त्यावर धावताना दिसतील.

काय आहे आणि ते कसे काम करणार ?

आत्तापर्यंत वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ निरीक्षक प्रत्यक्ष पाहून करीत असत. मात्र, नवीन एटीएस केंद्रामध्ये ही तपासणी मानवी डोळ्यांऐवजी अत्याधुनिक मशिनरी आणि सेन्सर्सद्वारे केली जाईल. यामुळे तपासणीत पारदर्शकता येईल आणि मानवी चुकांना वाव राहणार नाही.

ड्रायव्हिंग टेस्ट, फिटनेससाठी अत्याधुनिक केंद्र होताहेत सज्ज !

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. वाहनचालकांच्या कौशल्याची अचूक चाचणी घेण्यासाठी ऑटोमॅटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक आणि वाहनांच्या तांत्रिक क्षमतेसाठी ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन, अशा दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे.

पुण्यात तीन ठिकाणी एडीडीटीटी सेंटर

शहरात ऑटोमॅटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याचे काम आळंदी रोड, दिवे घाट, हडपसर या तीन ठिकाणी वेगाने सुरू आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जात आहेत. या अत्याधुनिक प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन ड्रायव्हिंग टेस्टची प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे चाचणी होणार असल्याने केवळ पूर्णतः प्रशिक्षित आणि कुशल चालकच रस्त्यावर उतरतील, ज्यामुळे रस्ते सुरक्षा अधिक बळकट होईल.

या केंद्रात वाहनांच्या खालील बाबींची तांत्रिक तपासणी केली

  • जाईल ब्रेक टेस्टिंग: वाहनाचे ब्रेक्स आपत्कालीन स्थितीत किती प्रभावी आहेत, याची अचूक मोजणी.

  • इंजिन परफॉर्मन्स: इंजिनची क्षमता आणि उत्सर्जनाची पातळी.

  • लाइट्स आणि इंडिकेटर: हेडलाइट्सचा प्रकाश आणि दिशा नियमांनुसार आहे की नाही, याची तपासणी.

  • स्टेअरिंग आणि सस्पेन्शन: वाहनाचे संतुलन आणि तांत्रिक मजबुती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT