Road Naming Policy Pudhari
पुणे

Pune Road Naming Policy: पुण्यात अरुंद रस्त्यांना नावाऐवजी क्रमांक; महापालिकेचे नवे धोरण

नाव देण्यासाठी कडक नियम; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच नामकरण, सदस्यांची एकमत आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या गल्लीबोळातील रस्त्यांना आता नावे न देताना त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत. तसेच, प्रभागातील रस्ते, चौक, उड्डाणपूल, तसेच महापालिकेच्या मिळकतींना नावे देताना संबंधित प्रभागातील एक सदस्य सूचक, तर उर्वरित सर्व सदस्यांचे अनुमोदन असणे आवश्यक असणार आहे. यासंबंधीचे नाव समिती धोरण महापालिका प्रशासनाने तयार केले असून, ते पक्षनेत्यांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

शहरातील रस्ते, चौक, उड्डाणपूल, तसेच महापालिकेच्या मिळकतींना नावे देण्यासाठी महापालिकेकडून नाव समिती नेमण्यात येते. या समितीकडे मागील दोन महिन्यांत 70हून अधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी नाव समितीच्या धोरणात बदल सुचविण्यात आले आहेत. या सुधारित धोरणानुसार आता रस्ते, चौक, उड्डाणपूल अशी मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण होण्याआधीच त्याला नाव देण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू होते, त्यामधून अनेकदा वादविवाद होतात.

तो रोखण्यासाठी संबंधित ज्या प्रकल्पाला नाव द्यायचे आहे, त्याचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतरच नाव देण्याचा प्रस्ताव स्वीकारला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ज्या प्रभागात हा प्रकल्प आहे, त्या प्रभागातील एक सदस्य सूचक, तर उर्वरित सर्व सदस्यांचे अनुमोदन असणे आवश्यक असणार आहे. याशिवाय नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांना नाव न देता संबंधित रस्त्यांना गल्ली क्रमांक दिले जाणार आहेत. पक्षनेत्यांच्या येत्या 15 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत या धोरणावर निर्णय होणार आहे.

प्रस्तावित बदल

  • प्रस्ताव दिल्यानंतर एक ते दोन महिने अभिप्रायासाठी लागणार

  • दोन प्रभागांच्या हद्दीवरील प्रकल्पांसाठी दोन्ही प्रभागांच्या सदस्यांची अनुमती हवी

  • पूर्वी नाव दिलेले असल्यास नवीन नाव दिले जाणार नाही

  • सलग रस्त्यावर एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत एकच नाव नावाबाबत वाद झाल्यास नाव समितीला निर्णय घेण्याचे अधिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT