पुणे: मान्सून 15 सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत असून, तो जाताना जोरदार बरसत आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी झाली. शहरात सायंकाळी 6 ते 6.30 या अर्ध्या तासात पावसाने जोरदार बॅटिंग केली. सर्वच रस्त्यांना पूर आला आणि गारठा वाढला. रात्री 8 पर्यंत शिवाजीनगरात 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
शहरात 1 सप्टेंबरपासूनच पाऊस कमी झाला होता. फक्त गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी 78 सप्टेंबर रोजी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस पूर्ण कमी झाला होता. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच मान्सून यंदा लवकर परतीला निघण्यास सुरुवात झाली. (Latest Pune News)
त्यामुळे शहरात शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला. दुपारी 4 नंतर आकाश काळ्या ढगांनी झाकोळून गेले आणि अतिमुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. रस्त्यांना पूर आला. शहरातील सर्व पेठा आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचले. तसेच हवेत गारवा निर्माण झाला.
तीन दिवस शहरात पावसाचा अंदाज
घाटमाथ्याला तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून 12 ते 15 सप्टेंबरदरम्यान ‘अतिमुसळधारे’चा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातदेखील ‘मुसळधार ते अतिमुसळधारे’चा अंदाज आहे. दिवसभर कडकऊन अन सायंकाळी पाऊस असे वातावरण आगामी तीन ते चार दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
शहरात सायंकाळी 8 पर्यंत झालेला पाऊस (मि.मी.)
शिवाजीनगर- 18
पाषाण- 3
लोहगाव- 2