Pune Railway Station Crime Pudhari
पुणे

Pune crime: पुणे हादरले! रेल्वे स्थानकावरुन 4 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, अत्याचारानंतर पुन्हा स्थानकावर सोडले; विकृतास अटक

Pune Railway Station Kidnapping Case 2026: पुणे लोहमार्ग पोलिसांनी नराधम महेश यादव (वय 25) याला अटक केली असून तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune Railway Station 4 Year Old Girl Assault Case

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी नराधम महेश यादव (वय 25) याला अटक केली असून तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात राहणारी 30 वर्षांची महिला तिचा पती, सासू आणि चार मुलांसह रोजगारासाठी महाराष्ट्रात आली होती. मनमाड–सोलापूर या भागात महिला व तिचा पती काम करत होते.16 फेब्रुवारीला रात्री महिला आणि तिचे कुटुंबीय खंडवाला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. खंडवाकडे जाण्यासाठी ते प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबले होते. दुसऱ्या सकाळी लवकर त्यांची ट्रेन होती.

17 फेब्रुवारी रोजी पहाटे दीड वाजता महिलेचा पती स्वच्छतागृहाकडे जात असताना त्याला चार वर्षांची मुलगी दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली असता ती सापडलीच नाही. पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता लाल रंगाचा टी-शर्ट व अर्धी पॅन्ट घातलेला एक तरुण मुलीचा हात धरून तिला घेऊन जाताना दिसला. नराधम तरुणासोबत जाताना मुलीने प्रतिकार केला नव्हता त्यावरुन तो पीडितेच्या ओळखीचा असावा हे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मुलीच्या पालकांना दाखवताच त्यांनी नराधमाला ओळखले.

नराधम ट्रेनमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या शेजारी बसला होता

नराधम तरुण हा ट्रेन प्रवासात पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या शेजारीच बसला होता, अशी माहिती समोर आली. एकीकडे पोलीस पुण्यातील बुधवार पेठ आणि इतर भागातील बांधकाम साईटवर कसून शोधमोहीम राबवत असतानाच दुसरीकडे सकाळी साडे पाचच्या सुमारास नराधम महेश हा पीडित चिमुकलीला घेऊन रेल्वे स्थानकात पोहोचल्याचे लक्षात आले. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी लगेच संशयिताला ताब्यात घेत चिमुकलीची सुटका केली.

खाऊ देण्याच्या बहाण्याने नेले

महेशने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकाबाहेर नेले. यानंतर निर्जनस्थळी नेत त्याने आक्षेपार्ह वर्तन केले, अशी माहिती चिमुकलीने महिला पोलिसांना दिली. मुलीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग, पोटदुखीची तक्रार यावरुन पोलिसांना संशय बळावला. वैद्यकीय तपासणीत चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी महेशला अटक केली आहे. महेश हा मूळचा मध्य प्रदेशमधील बालाघाटचा रहिवासी आहे. भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६५(२) तसेच POCSO कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT