Police  Pudhari
पुणे

Pune Police Transfers 2026: पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल; संजय दराडे सह पोलिस आयुक्त, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेत

पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, पुणे शहर, पुणे ग््राामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर केल्या आहेत. पुणे शहराच्या सह पोलिस आयुक्तपदी संजय दराडे यांची नियुक्ती केली आहे, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

पुण्यात बदलून आलेले अधिकारी संजय दराडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र येथून पुणे शहर सह पोलिस आयुक्तपदी), तेजस्वी सातपुते (समादेशक, एसआरपीएफ गट 1, पुणे येथून पदोन्नतीने पुणे शहर अपर पोलिस आयुक्त, गुन्हे पदी), एस. व्ही. पाठक (अपर पोलिस आयुक्त, ठाणे येथून विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे पदी), प्रशांत अमृतकर (समादेशक, एसआरपीएफ गट 16, कोल्हापूर येथून पुणे शहर पोलिस उप आयुक्तपदी),

गौहर हसन (पोलिस उप आयुक्त, सोलापूर येथून पुणे शहर पोलिस उप आयुक्तपदी), जीवन बेनवाल (सहायक पोलिस अधीक्षक, जिंतूर, परभणी येथून पुणे शहर पोलिस उप आयुक्तपदी), पी. आर. पाटील (पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पुणे शहर पोलिस उप आयुक्तपदी), शुभम कुमार (सहायक पोलिस अधीक्षक, अचलपूर, अमरावती येथून अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण पदी), संजय पाटील (पोलिस उप आयुक्त, नवी मुंबई येथून पोलिस उप आयुक्त, पिंपरी- चिंचवड या पदी), धीरज पाटील (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथून पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड या पदी), शफकत आमना (अपर पोलिस अधीक्षक, धाराशिव येथून पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग - सीआयडी, पुणे या पदी).

पुण्यातील अंतर्गत बदल आणि पदोन्नती

एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी (पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पदोन्नतीने पोलिस उप महानिरीक्षक - सीआयडी, पुणे पदी), विशाल गायकवाड (पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पदी), रोहिदास पवार (अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे येथून पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), पल्लवी बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून पोलिस अधीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे पदी ), संभाजी कदम (पोलिस उप आयुक्त, पुणे शहर येथून पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदी) आगामी काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

पुण्यातून बाहेर बदली झालेले अधिकारी

रंजन शर्मा (पुणे शहर पोलिस सह आयुक्तपदावरून विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र या पदी), लोहित मतानी (पुणे शहर पोलिस उप आयुक्तपदावरून पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, नागपूर या पदी), शिवाजी पवार (पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई या पदी), रमेश नागनाथ चोपडे (अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण येथून उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग या पदी), विक्रम देशमुख (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे येथून पोलिस उप आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार या पदी), हिम्मत जाधव (पुणे शहर येथून पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई या पदी), जयंत मीना (अधीक्षक एटीएस, पुणे येथून बृहन्मुंबई).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT