Punam Vidhate Pudhari
पुणे

Pune Municipal Election |महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'प्रभाग ९' मध्ये ‘महिला उद्योग भवन’ उभारणार; पुनम विधाते यांचा संकल्प

Poonam Vidhate Latest News: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Punam Vidhate's vision for Prabhag 9 Pune

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या पूनम विशाल विधाते यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाकांक्षी भूमिका मांडली आहे. प्रभागातील महिलांना उद्योग, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महिला उद्योग भवन’ उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.

महिलांमध्ये असलेली कौशल्ये, कल्पकता आणि काम करण्याची जिद्द यांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला उद्योग भवन हे केंद्र ठरणार असल्याचे विधाते यांनी सांगितले. या माध्यमातून महिलांसाठी प्रशिक्षण, उत्पादन, मार्केटिंग, बचत गटांचे बळकटीकरण, स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांना चालना दिली जाणार आहे.

प्रचारादरम्यान विविध भागांमध्ये घेतलेल्या बैठका, घरभेटी आणि संवादातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “महिलांना मदतीची नाही तर संधीची गरज आहे” ही भूमिका नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंब, समाज आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ९ मधील महिला बचत गट, गृहउद्योग चालवणाऱ्या महिला, कामगार महिला आणि तरुणींनी विधाते यांच्या या संकल्पनेचे स्वागत करत पाठिंबा दर्शवला आहे. महिला सशक्तीकरणाला केंद्रस्थानी ठेवणारा हा विकासाचा आराखडा प्रभागातील राजकारणात नवी दिशा देणारा ठरत आहे.

अपक्ष उमेदवार पूनम विधाते यांच्या प्रचारात महिलांची वाढती उपस्थिती आणि विश्वास हे त्यांच्या उमेदवारीचे मोठे बळ मानले जात आहे. या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण हे विधाते यांच्याबरोबर अपक्ष निवडणूक लढत आहेत. लाडक्या बहिणींनी आपला भाऊ प्रमोद निम्हण यांच्या मागेही भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन विधाते यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT