House Pudhari
पुणे

Pune PM Awas Yojana: पुणेकरांचे हक्काचे घराचे स्वप्न साकारणार; सहा भागांत ५ हजार ५३ घरे उभारणार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला महापालिकेची तयारी; घरांची किंमत १६ ते १९ लाख, अडीच लाखांपर्यंत अनुदान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा हाती घेतला असून, शहरातील सहा भागांत तब्बल ५ हजार ५३ घरे उभारण्याचे नियोजन केले आहे.

या घरांची किंमत साधारण १६ ते १९ लाख रुपये राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासना कडून मिळून अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेनुसार राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांत ३० ते ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिका उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक घरात स्वच्छता गृहासह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात ईव्हीएस घरांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

कुठे किती घरे?

  • बालेवाडी: २१४: १०

  • कोंढवा बु.: ९४०: २२

  • धानोरी: ७६०: १२

  • हडपसर: २१५८: ९९

  • वडगाव खु.: ४२९: ०७

  • खराडी: ५२२: ११

  • एकूण: ५०५३: १६१

अंदाजपत्रकात ७५ कोटी तरतूद

सर्वाधिक २ हजार १५८ घरे हडपसरमध्ये, तर कोंढवा बुद्रुक येथे ९४०, धानोरीत ७६०, खराडीत ५२२, वडगाव खुर्द येथे ४२९ आणि बालेवाडीत २१४ घरे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसोबत एकूण १६१ दुकानांची निर्मितीही केली जाणार आहे. योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प आराखडा स्थायी समितीच्या मंजुरीनंतर राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीमार्फत केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT