पुण्यात गृह कर्जाची एजन्सी चालवणार्‍या व्यक्तीचा खून झाला. Pudhari File Photo
पुणे

पुणे : गृह कर्जाची एजन्सी चालवणार्‍या व्यक्तीचा पुण्यात कोयत्याने खून

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गृह कर्ज मिळवून देण्याची एजन्सी चालविणार्‍या एका व्यक्तीचा टोळक्याने कोयत्याने डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून केला. मोबाईलचा हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

वासुदेव कुलकर्णी (वय 47, रा. हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयूर भोसले याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वासुदेव यांचे बंधू विनायक कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (1 सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या उत्कर्षनगर सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सासवड रोड येथे घडली.

वासुदेव हे सोसायटीसमोरील फुटपाथवर सासवड रोडकडे थांबले असताना, चौघांचे टोळके तेथे आले. त्यांनी वासुदेव यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉटची मागणी केली. वासुदेव यांनी त्यांना नकार दिला. या कारणातून त्यांच्यात वाद झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT