केज येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात काठी मारून पत्नीचा खून

Beed Crime News | संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
Kej wife murder
केज तालुक्यातील येडेश्र्वरी साखर कारखाना परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला.Pudhari News Network
Published on
Updated on

केज : पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील येडेश्र्वरी साखर कारखाना परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना आज (दि. ३१) दुपारी घडली. खून करून तो पळून जात असताना संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Beed Crime News)

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील नागझरी येथील विलास नामदेव आघाव आणि सुवर्णा विलास आघाव हे पती-पत्नी सारणी (आनंदगाव) येथे सालगडी म्हणून एका शेतात काम करीत होते. आज दुपारी विलासने त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशया वरून तिच्या डोक्यात काठी मारून जागीच खून केला. खून केल्या नंतर विलास पळून जात असताना पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रूग्णालयात हलविला आहे. मृत सुवर्णा आघाव हिला तीन अपत्ये आहेत.

युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.

Kej wife murder
बीड : दुचाकी-कारच्या अपघातात एकजण ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news