Crime : वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जातानाच झाला गणेशचा खून

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Gangwar was seen to be active again in the city and area
शहर व परिसरात गँगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आलेPudhari File Photo
Published on
Updated on

बारामतीत बुधवारी (दि. 21) रात्री गँगवॉरने पुन्हा डोके वर काढले. यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश धुळाबापू वाघमोडे (वय 17, रा. जळोची, बारामती) याचा बुधवारी रात्री खून झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामुळे शहर व परिसरात गँगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रकरणी मयत गणेश याचे मामा नवनाथ उत्तम चोरमले (रा. अहिल्यादेवी चौक जळोची, बारामती) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड, करण जाधव, अविष गरुड, सोमनाथ जाधव व भोल्या (पूर्ण नाव, पत्ते नाहीत) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.बुधवारी (दि. 21) सायंकाळी जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ ही घटना घडली. गणेश वाघमोडे व आरोपींची गतवर्षी टी. सी. कॉलेजजवळ भांडणे झाली होती. त्या रागातून इनोव्हा गाडीतून आलेल्या या सहा जणांनी फिर्यादीचा भाचा गणेश वाघमोडे याला धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर व इतरत्र वार करून त्याचा खून केला.

दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बरोबर दोन वर्षांनी खून

दोन वर्षांपूर्वी 18 ऑगस्ट रोजी गणेश वाघमोडे व त्याच्या अन्य सहकार्‍यांनी बारामतीत शशिकांत बाबासो कारंडे यांचा खून केला होता. कारंडे यांचा मुलगा व इतर अल्पवयीनांमध्ये एका मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद झाला होता. त्या वादात शशिकांत यांनी मध्यस्थी करत या तरुणांची समजूत घालत त्यांना वडिलकीच्या नात्याने समजावले होते. त्याचा राग मनात धरत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तिघा अल्पवयीनांनी कारंडे यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. त्यानंतर आता बरोबर दोन वर्षांनी गणेश याचा खून झाला.

गणेश वाघमोडेवर चार गंभीर गुन्हे दाखल

अल्पवयीन असलेल्या गणेश वाघमोडे याच्यावर बारामतीत यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये त्याच्यावर खुनाचा, 2023 मध्ये खुनाच्या प्रयत्नासह शस्त्र अधिनियम तसेच शस्त्रांसह जमाव जमवून मारहाण, गंभीर मारहाण असे चार गुन्हे त्याच्यावर यापूर्वी दाखल आहेत.

सज्ञान होण्यासाठी केवळ एक महिना शिल्लक

स्वतःच्या वाढदिवसासाठी साहित्य खरेदी करून गणेश हा बुधवारी घरी निघाला होता. या वेळी त्याच्यावर हल्ला करत त्याचा खून करण्यात आला. तो सज्ञान होण्यासाठी अवघ्या एक महिन्याचा कालावधी आता उरलेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news