Cyber Fraud Pudhari
पुणे

Online Task Fraud: ऑनलाइन टास्कच्या आमिषाला बळी; पुण्यात तरुणीची 7.10 लाखांची सायबर फसवणूक

घरबसल्या कमाईचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले; स्वारगेट पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी ही महर्षीनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी १५ जून रोजी तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखविले. तरुणीला जाळ्यात ओढून चोरट्यांनी तिला ऑनलाइन पद्धतीने काम करण्यास सांगितले.

या कामाचे तिला पैसे दिल्याचे भासवले. प्रत्यक्षात तरुणीच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे परतात. या कामात पैसे गुंतविल्यास फायदा होईल, असे सांगून चोरट्यांनी तरुणीला पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तरुणीने चोरट्यांच्या खात्यात सात लाख दहा हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला पैसे दिले नाहीत. चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी सात लाख दहा हजार रुपये जमा केले. सपोनि जगदाळे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT