Arrested Pudhari
पुणे

Pune Crime: एक कोटींच्या रोकड लुटीचा प्रयत्न; फरार पोलिस हवालदार जालन्यात अटकेत

शिवापूर चौकीतही २६ लाखांवर डल्ल्याचा प्रयत्न; महिला पोलिस हवालदार अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एक कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला पोलिस असल्याचे सांगून त्याची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणे आणि त्यानंतर त्याला शिवापूर पोलिस चौकीत नेऊन तेथेही २६ लाखांच्या रोकडीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पोलिस हवालदार अजीज अब्बास इसुब मेस्त्री याला अखेर नऱ्हे पोलिसांनी जालन्यातील अंबड येथून अटक केली. मात्र, या प्रकरणातील आरोपी महिला पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम अद्याप फरार असून, तिने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

, , , Narhe Police, Shivapur Police Chowki,, Ajij Abbas Mestri, Pramila Nikam, ,, Jalna

हर्षवर्धन भूषण पवार हे व्‍यवसाय करतात. १७ जुलै रोजी किरण आपटे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चव्हाण एंटरप्रायझेसच्या मालकाला एक कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार, १८ जुलै रोजी पवार कर्मचारी बाबू पवार यांच्यासह एक कोटी रुपये घेऊन निघाले. त्यानंतर पवार, आपटे आणि चव्हाण एंटरप्रायझेसचा प्रतिनिधी हे कारमधून नऱ्हेकडे रवाना झाले.

नवले पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवली. ‘आम्ही पोलिस आहोत; तुमच्याकडे काळा पैसा आहे,’ असे सांगत त्यांनी रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी किरण आपटे ७३ लाख ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एका व्यक्तीने पवार यांच्या डोळ्यांत तिखट फेकून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि कार शिवापूर पोलिस चौकीकडे नेली.

शिवापूर पोलिस चौकीतही पवार यांच्याकडील २६ लाख रुपयांची रोकड काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विक्रम चकणकर, अमेय, गणेश कदम आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि अजीज अब्बास मेस्त्री यांची या दरोड्यातील भूमिका समोर आली.

या प्रकरणात सहभागी एका पत्रकारालाही अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर मेस्त्री फरार झाला होता. माहितीवरून नऱ्हे पोलिसांनी त्याला जालना जिल्ह्यातील अंबड येथून अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अटक केलेले बहुतांश आरोपी येरवडा कारागृहात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT