पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरी क्लब आयोजित मेकअप आणि नेल आर्ट कार्यशाळेत कस्तुरी सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोंढवा येथे 'मी रूपवती, मी सौंदर्यवती' या मेकअप आणि नेल आर्ट कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्याला कस्तुरी सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मेकअप आर्टिस्ट संध्या गोळे यांनी अतिशय सुंदर प्रकारे मेकअप करून दाखविले. अनेक टिप्स देत आणि कोणत्या चेहर्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे आणि कोणत्या क्रमाने कोणते क्रीम, सौंदर्य प्रसाधने वापरावीत याची माहिती दिली.
कोणत्या कार्यक्रमात कोणता मेकअप करावा, कसा करावा आणि व्यवसायात यशस्वी भरारी घेऊन कुटुंबाला हातभार लावू शकतो, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. द नेल बॉक्स नेल आर्टिस्ट प्राची लोणकर यांनी नेल आर्टविषयी नखांना वेगवेगळ्या रंगांनी व आकर्षक डायमंडने कसे सजवायचे याबद्दल मार्गदर्शन केले, याकडे व्यवसाय म्हणून पाहू शकतो याविषयीही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख पूजा पांगारे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा