पुणे

Pune News : डेक्कन क्वीन, सिंहगडसह इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर-खडकीदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने काही तांत्रिक कामे क़रण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या शनिवारी आणि रविवारी डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह पुणे-लोणावळा दरम्यानच्या 46 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. या दोन दिवसांत चाकरमानी प्रवाशांचे चांगलेच हाल होणार असल्याचे दिसत आहे.

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर शिवाजीनगर-खडकी स्थानका-दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीसह विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने शनिवार, दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी ट्राफिक ब्लॉक घेतला आहे. पुणे-मुंबई-पुणेदरम्यानची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणार्‍या चाकरमान्यांची दोन दिवस चांगलीच धावपळ होणार आहे.

या गाड्या उशिराने धावणार

शनिवार दि. 25 नोव्हेंबरला बंगळुरू येथून सुटणारी गाडी क्रमांक 11302 बंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 16506 बंगळुरू – गांधीधाम एक्स्प्रेस आणि रविवार दि. 26 नोव्हेंबरला मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस तसेच 11019 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आणि 22732 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेस पुणे विभागावर उशिराने धावतील.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT