पुणे : आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी स्वच्छ शौचालये हा प्रत्येकाचा हक्क आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मुले दररोज सहा-सात तास शाळेत व्यतीत करतात. त्यामुळे शाळेतील शौचालये स्वच्छ असण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. अस्वच्छ शौचालयांमुळे जलजन्य आजार, मूत्रमार्गामध्ये संसर्ग, मुलींमध्ये मासिक पाळीशी संबंधित समस्या उदभवतात. आजकाल शैक्षणिक संस्था पालकांकडून भरमसाठ फी आकारतात. त्यातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जातात.
मात्र, अत्यावश्यक बाब असलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे बरेचदा दुर्लक्ष होते. मुला-मुलींच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आजकाल पालक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वी स्वच्छतागृहांबाबत प्राधान्याने विचारणा आणि पाहणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवाणू, ई कोलाई मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तेव्हा मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्रवाहिनीचा दाह उदभवतो. त्यामुळे मुलांमध्ये संसर्गाचा धोका निर्माण होतो. अस्वस्छ स्वच्छतागृहांमुळे मुलींमध्ये मूत्र रोखून धरण्याचे प्रमाणही जास्त आहे.
यामुळेही संसर्गाचे प्रमाण वाढते. मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये प्रमाण अधिक दिसून येते.शौचालये स्वच्छ ठेवणे आवश्यक बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी शौचालये नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करणे आवश्यक आहे. स्वच्छ शौचालयामुळे जिवाणूंच्या संक्रमणाचा धोका कमी होतो आणि मुलांचे आरोग्य सुरक्षित राखणे शक्य होते. स्वच्छतेच्या योग्य प्रोटोकॉलची अंमलबजावणी करून
आणि शौचालय वापरल्यानंतर हातांच्या स्वच्छतेसारख्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आणि यूटीआयचा प्रसार
कमी करणे शक्य आहे, असेही डॉ. अतुल पालवे यांनी स्पष्ट केले.
बर्याचदा मूत्रविसर्जन रोखावे लागू नये यासाठी विद्यार्थी कमी पाणी पितात. त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. मुलांची रोगप्रतिकारकशक्ती पूर्ण विकसित झाली नसल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे, शौचालय वापरल्यानंतर हात व्यवस्थित न धुणे किंवा नीट न पुसणे यामुळेही
आरोग्यावर परिणाम होतो.
– डॉ. अतुल पालवे, बालरोगतज्ज्ञ
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.