Pune Municipal Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: रामटेकडी–माळवाडी प्रभागात भाजपचा विजय; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपचे तीन नगरसेवक विजयी; विद्यमान आमदार चेतन तुपेंना धक्का

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद गिरी

हडपसर: प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी- माळवाडी-वैदुवाडी हा भाग विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या मतदारसंघातील प्रभाग आहे. पण, त्या प्रभागावरील आपले वर्चस्व त्यांना टिकवता आले नाही. नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलल्याची चर्चा रंगू लागली.

रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी या प्रभागाला रामटेकडी, वैदुवाडी भाग जोडला आहे. सुशिक्षित आणि झोपडपट्टीचा परिसर समाविष्ट म्हणून या प्रभागाची ओळख होती. या प्रभागात काँग््रेास (आय) मधून भाजपमध्ये प्रशांत तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, शुभांगी होले यांचा नुकताच प्रवेश झाला होता. भाजपने त्यांना महापालिकेची उमेदवारी जाहीर केली. या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद मजबूत असतानाही ‌‘अ‌’ वर्गातून भाजपचे खंडू लोंढे यांना 14,216 मते मिळाल्याने ते विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग््रेासचे अशोक कांबळे यांचा 59 मतांनी पराभव झाला, तर ‌‘ब‌’ गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार हेमलता मगर यांना 17,254 मते मिळाली, त्या विजयी झाले.

त्यांनी भाजपच्या शुभांगी होले यांचा पराभव केला. तर ‌‘क‌’ मधून भाजपच्या पायल तुपे यांना 15,780 मते मिळाली, त्या विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता तुपे यांचा पराभव केला. तर ‌‘ड‌’ मधून भाजपचे प्रशांत तुपे यांना 15,727 मते मिळाल्याने ते विजय झाले, त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग््रेासचे सलग तीनवेळा निवडून येणारे व चौथ्यांदा निवडणुकीत उभे असलेले आनंद आलकुंटे यांचा पराभव केला. प्रभाग 17 रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी या प्रभागाच्या निकालाविषयी उत्सुकता मतदारांना खूप होती.

विद्यमान आमदाराचे बलस्थान या प्रभागात अधिक असूनही, पालिकेच्या निवडणुकीत आमदाराने घरातील उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे या भागातील चारही राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास होता. मात्र, या प्रभागात नव्याने प्रवेश केलेल्या भाजपचे उमेदवार दोन पुरुष, एक महिला निवडून आले. त्यामुळे स्थानिक आमदाराला गड राखता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीच्या हेमलता मगर या 17,254 मते मिळवून विजयी झाल्या.

राष्ट्रवादीविरोधात भाजपने मांडल्या समस्या

प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी या प्रभागाला मगरपट्टा-माळवाडी, 15 नंबर डीपी रोड, अण्णासाहेब मगर कॉलेजपर्यंतचा भाग या प्रभागात समाविष्ट आहे. या भागातील प्रामुख्याने समस्या अतिक्रमण, अरुंद रस्ते, भोसले गार्डन दुरवस्था, क्लब हाऊस मगरपट्टा चौकातील वाहतूक कोंडी, माळवाडी परिसरातील विविध समस्या, कॅनॉललगत रस्त्याची दुरवस्था व तेथील अरुंद रस्ते अशा विविध समस्या असल्याने राष्ट्रवादीच्विरोधात भाजपने प्रामुख्याने प्रश्न मांडले होते. यामुळे त्यांना पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी प्राधान्य दिले. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला यश मिळू शकले नाही.

... त्यांना मताधिक्य, मग आम्हाला कमी कसे!

प्रभाग क्रमांक 17 मध्ये हेमलता नीलेश मगर यांना सुमारे 4,996 मतांचे मताधिक्य मिळते, मग आम्हाला का कमी मिळते? असा प्रश्न पक्षातील पराभव उमेदवारांबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी चर्चा करताना ठिकठिकाणी पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT