Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास

महादजी शिंदे यांच्या सरदार संताजीबाबा गरुड यांच्या विजयाच्या तलवारी पाहून सभागृहात रोमांच
Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास
Published on
Updated on

Maratha Mughal Panipat Battle Swords History

आशिष देशमुख

पुणे: पानिपतच्या युद्धात मराठे प्राणांची बाजी लावून लढले. मात्र, या 1761 मध्ये या युद्धात हार झाली. पण, पुढे दहा वर्षांनीच माधवराव पेशवे यांच्या प्रेरणेने पुन्हा एकदा मराठा सरदारांनी आपले शौर्य दाखवत दिल्ली काबीज केली अन्‌‍ तेथे भगवा ध्वज फडकवला.

Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास
Pune Water Supply Closed: वडगाव जलपुरवठा १२–१३ फेब्रुवारी रोजी देखभालीसाठी थांबणार

त्या विजयाच्या साक्षीदार असलेल्या दोन तलवारी तब्बल 255 वर्षांनी मंगळवारी भारत इतिहास संशोधक मंडळात प्रकट झाल्या. त्या याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले. या युद्धात सहभागी झालेले महादजी शिंदे यांचे सरदर संताजीबाबा गरुड यांच्या वंशजांनी या तलवारी जतन केल्या आहेत.

Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास
Emotorad Road Safety Pune: ईमोटोराड आणि YTDS पुण्यात रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे आयोजन
Battle of Panipat in 1761
Ranjitsinh Garud Deshmukh Battle of Panipat in 1761 Pudhari

पुण्यात महादजी शिंदे यांचे सरदार संताजीबाबा गरुड देशमुख यांचे 13 वे वंशज सरदार रणजितसिंह गरुड देशमुख राहतात. ते व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांच्या घराण्याला मोठा वारसा आहे. त्यांच्या अनेक पिढ्या या ग्वाल्हेर येथेच महादजी शिंदे यांच्या सरदार म्हणून कार्यरत होत्या. पानिपतच्या लढाईत गरुड घराण्यातील सरदार संताजीबाबा गरुड, शंकररावबाबा गरुड, त्र्यंबकराव गरुड, नारायण गरुड यांनी आपले शौर्य दाखवले. 1771 मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकत आलमगीर बादशाहचा पराभव करताच दोन तलवारी विजयाची आठवण म्हणून महादजी शिंदे यांनी सरदार संताजीबाबा यांना तलवारीवर त्यांचे नाव कोरून दिल्या.

Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास
Maharashtra TET Exam: महाराष्ट्रमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी दुसरी परीक्षा घेण्याची घोषणा

तलवारी पाहताच रोमांच उभे राहिले!

या दोन तलवारी अजूनही सुस्थितीत आहेत. त्यावर संताजीबाबा गरुड असे नाव कोरलेले आहे. पानपितच्या युद्धाचा बदला म्हणून 1771 चे युद्ध जिंकल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. पुण्यातील गरुड घराण्याचे तेरावे वंशज रणजितसिंह गरुड देशमुख यांनी तो इतिहास सर्वांना सांगितला तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मराठ्यांनी दिल्ली जिंकल्याचा तो पुरावा अजूनही आहे, हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. माजी हवाईदलप्रमुख प्रदीप नाईक, भूषण गोखले यांच्यासह सर्व सभागृहाने या तलवारीची उत्सुकतेने माहिती घेतली. त्या तलवारी हातात घेत फोटो काढले. अनेकांनी तलवारींना नमनही केले.

Maratha Delhi Victory Swords: पानिपतच्या पराभवानंतर 1771 मध्ये मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली होती, या 2 तलवारींचा इतिहास
Maharashtra Board Exam Counselling: दहावी-बारावी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व हेल्पलाईन सुविधा

या दोन तलवारी माझ्या वैयक्तिक संग््राहात आहेत. मी गरुड घराण्यातील तेरावा वंशज आहे. माझे वडील 1954 मध्ये ग्वाल्हेर येथून पुण्यात आले, तेव्हा या तलवारी घेऊन आले होते. त्या मी पुढे जतन केल्या. मंगळवारी (दि. 10 फेबुवारी 2026) मराठ्यांनी दिल्ली जिंकली तो दिवस 10 फेबुवारी 1771 हा होता. त्या घटनेला 255 वर्षे झाल्याने या तलवारी मी पांडुरंग बलकवडे यांच्या आग््राहाखातर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी आणल्या.

सरदार रणजितसिंह गरुड देशमुख, गरुड घराण्याचे 13 वे वंशज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news