Pune Municipal Corporation Election 2026 Result Sunny Nimhan Pudhari
पुणे

Pune Mahapalika Election Results 2026: औंध, बोपोडीत भाजपने उडवला विरोधकांचा धुव्वा, चारही उमेदवार विजयी

चारही जागांवर भाजपचे वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा, केवळ २९.५३ टक्के मतदानाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मतदार संघात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला. भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून निवडून आले. अ गटातून परशुराम वाडेकर यांना २० हजार १२६, ब गटातून भक्ति अजित गायकवाड यांना २० हजार ३८३, क गटातून सपना छाजेड यांना २१ हजार १०७, तर क गटातून चंद्रशेखर (सनी) निम्हण यांना २१ हजार ७८२ मते मिळवत विजय मिळवला.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची मतमोजणी ही बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथे पार पडली. या ठिकाणी प्रभाग क्रमानं ८ औंध बोपोडी आणि प्रभाग क्रमांक ९ सूस, बाणेर, पाषाण मतदार संघाची मतमोजणी पार पडली. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. सर्व पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीसाठी जमले होते. प्रभाग क्रमांक ८ च्या एकूण ६ फेऱ्या पार पडल्या. ९६६४३ मतदानापैकी ४३ हजार २२७ मंतदादारांनी मतदानाचा हक्क बाजवला. केवळ २९.५३ टक्के मतदानाची नोंद झाली.

या मतदार संघात अ गट हा अनुसूचित जाती, ब गट महिला ओबीसी, क गट सर्वसाधारण महिला, तर ड गट सर्वसाधारण असे राखीव होते. अ गटात कॉंग्रेसच्या सुंदर ओव्हाळ, आपचे चंद्रकांत चव्हाण, बसपाचे रमेश ठोसर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे वसुधा निरभवणे, मनसे कडूंन विठोबा रणदिवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विनोद रणदिवे, भाजपकडून परशुराम वाडेकर, बहुजन भारत पार्टी कडूंन शुभम अडागळे निवडणूक रिंगणात उभे होते. तर ब गटातून कॉंग्रेसकडून प्राजक्ता गायकवाड, भाजपकडून भक्ती गायकवाड, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पौर्णिमा रानवडे उभ्या होत्या. क गटातून भाजपच्या संपणा छाजेड, सिवसेनेच्या अंजली दिघे, कॉंग्रेसच्या सुप्रिया भुतडा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना मुसळे, तर ड गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश ढोरे, भाजपकडून सनी निम्हण, व कॉंग्रेस कडूंन रमेश पवळे निवडणूक रिंगणात होते.

पहिल्या फेरीपासून भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर होते. तर ड गटातून राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे आघाडीवर होते. तर सनी निम्हण हे काही मतांनी मागे होते. एकूण सहा फेऱ्या पार पडल्या. यानंतरच्या चारही फेऱ्यांमध्ये सनी निम्हण यांनी आघाडी घेतली व विजयी झाले. भाजप उमेदवारांनी आघाडी घेताच राष्ट्रवादीचे नेते मधुकर मुसळे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्यावर प्रभाग क्रमांक क मधून भाजपच्या भक्ति गायकवाड आणि राष्ट्रवादीच्या अर्चना मुसळे यांच्यात चांगली लढत सुरू होती. मात्र, भक्ती गायकवाड यांनी घेतलेली आघाडी ही सहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. भक्ति गायकवाड यांना २० हजार ३८३ तर अर्चना मुसळे यांना केवळ १२ हजार २१९ मते पडली. यामुळे मोजणीसाठी उपस्थित असलेले अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे यांनी मतमोजणी केंद्रातून हताशपणे बाहेर पडले.

प्रकाश ढोरे आणि सनी निम्हण याच्यात झाली रंगतदार लढत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश ढोरे आणि भाजपचे सनी निम्हण यांच्यात काटे की टक्कर होती. या लढतीकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष होते. पहिल्या फेरीत प्रकाश ढोरे यांना ३ हजार ९४७ तर ३ हजार २३० मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत देखील ढोरे यांना ३ हजार ५०६ तर निम्हण यांना ३ हजार ८५ मते मिळाली. मात्र, यानंतरच्या ४ फेरीमध्ये निम्हण यांनी आघाडी घेत ढोरे यांना मागे टाकले. अंतिम फेरीत निम्हण यांनी आघाडी घेत २१ हजार ७८२ मते मिळवत विजय खेचून आणला. तर ढोरे यांना केवळ १३ हजार ७२८ मतांवर समाधान मानावे लागले.

नोटाला पडली ७ हजार ३७१

प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदारांनी नोटाला जास्त मते दिली. अ गटात १ हजार ६१३, ब गटात १ हजार ९२८, क गटात १ हजार ७४९ तर ड गटात २ हजार ०८१ मते मिळून ७ हजार ३७१ मते पडली. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसला बसला असे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होते.

प्रमुख पक्षांचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते

अ गट (अनुसूचित जाती)

  • परशुराम बाळकृष्ण वाडेकर (भाजप) २०१४६

  • सुंदर नितीन ओव्हाळ (कॉंग्रेस) ३८७२

  • विनोद दादासाहेब राणपिसे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ११३९९

  • मिलिंद गेनू खरात (वंचित) १६७९

ब गट महिला ओबीसी

  • भक्ती अजित गायकवाड (भाजप) २०३८३

  • पौर्णिमा बाळासाहेब रानवडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १२२१९

  • प्राजक्ता गायकवाड (कॉंग्रेस) ४८२१

  • आतार मुसकान नाजीम (आप)१४८५

क गट सर्वसाधारण महिला

  • सपना छाजेड (भाजप) २११०७

  • अर्चना मुसळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) ११४१०

  • सुप्रिया भुतडा (कॉंग्रेस) ३८४४

  • अश्विनी अशोक गायकवाड (वंचित) २३८२

ड गट सर्वसाधारण

  • चंद्रशेखर (सनी) निम्हण (भाजप) २१७८२

  • प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) १३७२८

  • रमेश पवळे (कॉंग्रेस) ९४१

  • अमित जाविर (आप) १२०९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT