PMC Election Scrutiny Pudhari
पुणे

Pune Municipal Election Nomination Scrutiny: पुणे महापालिका निवडणूक; 3,052 अर्जांची छाननी; 2,397 वैध, 131 बाद

क्षेत्रीय कार्यालयांत रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया; काही प्रमुख उमेदवारांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 3 हजार 52 उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यापैकी 131 अर्ज बाद झाले असून, 2 हजार 397 अर्ज वैध ठरले आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये छाननीचे काम सुरूच होते. महापालिकेच्या 165 जागांसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांत अर्जांची छाननी केली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्जांवर आक्षेप नोंदवण्यात आले होते आणि त्यावर सुनावण्या देखील झाल्या. पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांत अर्जाची छाननी करण्यात आली. 165 जागांसाठी 3 हजार 52 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता सुरू झालेली अर्ज छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनेक क्षेत्रीय कार्यालयात अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुनावण्या सुरू होत्या.

येरवडा -कळस - धानोरी कार्यालयाकडे प्राप्त 248 अर्ज त्यापैकी वैध अर्ज एकूण 246 असून, 2 अर्ज अवैध ठरवली आहेत. नगर रोड-वडगाव शेरी कार्यालयाकडे प्राप्त 243 अर्ज त्यापैकी वैधरीत्या नामनिर्देशन एकूण 190 असून, 53 अर्ज अवैध ठरली. कोथरूड बावधन कार्यालयाकडे प्राप्त 174 त्यापैकी वैधरीत्या नामनिर्देशन एकूण 158 असून 16 नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आलेली आहेत. औंध बाणेर कार्यालयाकडे प्राप्त 113 त्यापैकी वैध अर्ज 101 असून, 12 अवैध ठरली आहेत. शिवाजीनगर घोले रोड कार्यालयाकडे प्राप्त 159 त्यापैकी वैध नामनिर्देशन एकूण 156 असून, 3 अर्ज अवैध ठरली आहेत. कै. बा. स. ढोले पाटील रोड कार्यालयाकडे प्राप्त 122 त्यापैकी 114 वैध, तर 8 अर्ज अवैध ठरली आहेत. हडपसर मुंढवा कार्यालयाकडे प्राप्त 349 अर्जांपैकी वैध एकूण 317 असून, 32 अर्ज अवैध ठरली आहेत. वानवडी रामटेकडी कार्यालयाकडे प्राप्त 263 त्यापैकी वैधरीत्या नामनिर्देशन एकूण 261 असून, 2 नामनिर्देशन अवैध ठरलीत. बिबवेवाडी कार्यालयाकडे प्राप्त 238 त्यापैकी वैध अर्ज एकूण 231 असून, 7 अर्ज अवैध ठरली आहेत.

भवानी पेठ कार्यालयाकडे प्राप्त 294 त्यापैकी 280 वैध तर 14 नामनिर्देशन अवैध ठरली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी वारजे कर्वेनगर कार्यालयाकडे प्राप्त 171 पैकी सर्व 171 अर्ज वैध आहेत. सिंहगड रोड कार्यालयाकडे प्राप्त 167 त्यापैकी वैध अर्ज 162 असून 5 अर्ज अवैध ठरलेली आहेत. धनकवडी सहकारनगर कार्यालयाकडे प्राप्त 242 त्यापैकी 231 वैध तर 11 नामनिर्देशन अवैध ठरली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कोंढवा येवलेवाडी कार्यालयाकडे प्राप्त 94 त्यापैकी 85 अर्ज वैध तर 9 अवैध ठरली आहेत. कसबा विश्रामबाग वाडा कार्यालयाकडे नामनिर्देशन पत्रांची अजूनही छाननी सुरू असून, कसबा विश्रामबाग वाडा कार्यालयाकडील माहिती वगळता असे एकूण 2877 नामनिर्देशन पत्रांपैकी 2703 अर्ज छाननीअंती वैध असून, 174 अर्ज अवैध ठरली आहेत.

नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अंतिम दिवशी 2436 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले तसेच काही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडे उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्यामुळे नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागला.

भोसले, जगताप, धेंडे, बागवेंना दिलासा

प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर जानवडीच्या भाजपच्या रेश्मा भोसले यांच्या अर्जावर ‌’आप‌’ने मालमत्तेवर थकबाकीबाबत आक्षेप घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली होती. मात्र, आक्षेप फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला. तसेच, प्रभाग क्रमांक 36 धनकवडी सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाचे शहारध्यक्ष सुभाष जगताप, काँग््रेासचे अविनाश बागवे यांच्याही अर्जावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळाल्याने त्यांना दिलासा मिळाला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT