पुणे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज विक्रीला सुरवात होऊन पाच दिवस उलटूनही शनिवारपर्यंत केवळ ३८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ ३ दिवस उरले असल्याने निवडणूक कार्यालयातील गर्दी वाढणार आहे. आता पर्यंत ९१०१ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून शनिवारी (दि. २७) १२०९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.
शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नामनिर्देशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यामध्ये येरवडा-कळस-धानोरी, नगररोड-वडगाव शेरी, कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रोड, ढोले-पाटील रोड, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर तसेच कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जात आहेत. अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केली नाही. काही भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांना तयारीला लागण्याचे निरोप दिले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत नामनिर्देशन अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
येरवडा-कळस-धानोरी-४६
नगर रोड-वडगावशेरी-१३१
कोथरूड-बावधन-४५
औंध-बाणेर-४५
शिवाजीनगर-घोले रोड-९१
ढोले-पाटील रोड-६४
हडपसर-मुंढवा-७५
वानवडी-रामटेकडी-८१
बिबवेवाडी-७६
भवानी पेठ-८५
कसबा-विश्रामबाग वाडा-५३
वारजे-कर्वेनगर-१२६
सिंहगड रोड-९६
धनकवडी-सहकारनगर-११८
कोंढवा-येवलेवाडी-७४
एकूण-१२०९
नगर रोड-वडगावशेरी-१३
ढोले-पाटील रोड-५
कसबा-विश्रामबाग वाडा-४
शिवाजीनगर-घोले रोड-४
येरवडा-कळस-धानोरी-२
नगर रोड-वडगावशेरी-१
धनकवडी-सहकारनगर-१
कोथरूड-बावधन-२
कोंढवा-येवलेवाडी-२
वारजे-कर्वेनगर-१
भवानी पेठ-१
बिबवेवाडी-१
हडपसर-१
एकूण ३८