विकासकामांची थर्ड पार्टी तपासणी बंधनकारक; महापालिकेच्या भ्रष्टाचारावर आयुक्तांचा थेट ‘वॉच’ Pudhari
पुणे

Pune News: विकासकामांची थर्ड पार्टी तपासणी बंधनकारक; महापालिकेच्या भ्रष्टाचारावर आयुक्तांचा थेट ‘वॉच’

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या विकासकामांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पाच लाखांपुढील प्रत्येक विकासकामांची थर्ड पार्टीकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय एकूण कामांच्या दहा टक्के कामांची दक्षतामार्फतही प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी होणार आहे. त्यामुळे आता विकासकामांमधील गोलमाल प्रकरणांना आळा बसणार आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत होणार्‍या पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या विकासकामांची थर्ड पार्टी गुणवत्तातपासणी बंधनकारक आहे. त्यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांची नेमणूक केली असून, या कंपनीकडून तपासणी बंधनकारक आहे. (Latest Pune News)

मात्र, अनेकदा संबंधित क्षेत्रीय आयुक्त अथवा खातेप्रमुख या कंपनीमार्फत तपासणी न करता अन्य कंपन्यांकडून तपासणी करून घेत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे विकासकामांमधील गुणवत्तेचा प्रश्नही उपस्थित होत होता.

तसेच अशा कामांमध्ये गैरव्यवहारांचे प्रकार घडत होते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची गंभीर दखल घेत आता आयुक्त राव यांनी देखभाल दुरुस्तीची कामे वगळून पाच लाखांवरील प्रत्येक विकासकामाच्या गुणत्तेची तपासणी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यासंस्थेमार्फत करणे बंधनकारक केले आहे.

Pandharpur Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे भल्या पहाटे शहरात आगमनजर संबंधित कंपनीकडून गुणवत्ता तपासणी करून घेणे शक्य नसेल, तर संबंधित खात्यांने अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. तसेच सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागांकडील किमान 10 अथवा 10 टक्के निविदा प्रकरणांची प्रत्यक्ष जागेवर गुणवत्ता तपासणी करावी आणि त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेश आयुक्त राम यांनी दिले आहेत.

त्यामुळे आता महापालिकेच्या विकासमांवर थर्ड पार्टी कंपनीसह प्रशासनाचा थेट वॉच राहणार असून, विकासकामांमधील भ्रष्टाचार रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT