Gas Pipeline Pudhari
पुणे

MNGL Gas Pune: पुण्यात एमएनजीएल गॅसला मागणी वाढली; LPG तुटवड्यात पाइप गॅसचा पर्याय गाजतो

दररोज 400 हून अधिक नवीन कनेक्शन; स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर गॅसकडे नागरिकांचा कल

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साधारण 18 लाख रहिवासी सदनिकाधारक आहेत. त्यातील तब्बल 8 लाख 40 हजार ग््रााहकांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेट अर्थात एमएनजीएलने गॅसपुरवठा केला आहे. यामध्ये 3 लाख 80 पिंपरी-चिंचवडमधील, तर 4 लाख 60 हजार पुण्यातील गॅसजोडण्या आहेत. सध्या एलपीजी गॅसपुरवठा अडचणीत आलेला असताना दैनंदिन 180 ते 185 जोडण्या देणाऱ्या एमएनजीएलमार्फत आता 400 हून अधिक जोडण्या देण्यात येत असल्याची माहिती एमएनजीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएनजीएलकडून पाइपद्वारे गॅस देण्यात येत असल्यामुळे केवळ सोसायट्यांमध्ये आणि पक्क्या घरांमध्येच गॅसकनेक्शन देता येते. एलपीजी गॅसचा पुरवठा हा आयातीवर अवंलबून आहे. परंतु, एमएनजीएलचा गॅस नैसर्गिक पध्दतीने देशात आणि राज्यातच मुबलक प्रमाणात उत्पादित होत असल्यामुळे त्याचा पुरवठा हा कधीही न थांबता करण्यात येत आहे.

घरगुती जोडण्यांबरोबरच 570 ते 580 हॉटेल तसेच रेस्टॉरंटला देखील व्यावसायिक गॅसपुरवठा करण्यात आला आहे. एखाद्या सोसायटीत ठरावीक लोकांनाच कनेक्शन देता येते. परंतु, सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटपर्यंत हे कनेक्शन नेऊन ठेवण्यात येते. त्यानंतर जेवढे लोक अर्ज करतील, त्यांनाच प्रत्यक्ष कनेक्शन देण्यात येते. एलपीजी गॅस साधारण 920 रुपये अधिक वाहतूक खर्च असा आहे, तर एमएनजीएल गॅस 50 रुपये क्युबिक मीटरने दिला जातो. त्यामुळे एलपीजीच्या तुलनेत संबंधित गॅस परवडणारा आहे. एमएनजीएलचे बिल दोन महिन्यांतून एकदाच येते. गॅस वापरल्यानंतर बिल येते. तर एलपीजी गॅससाठी मात्र एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे सिलिंडरच्या बुकिंगपासून ते घरापर्यंत आणण्याच्या सर्व क्लिष्टतेपासून मुक्तता मिळते. तसेच पाण्याच्या नळासारखा गॅस देखील घरात कोणत्याही कटकटीशिवाय उपलब्ध होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोसायट्यांनी पुढे येण्याची गरज

आठ लाख जोडण्या जरी एमएनजीएलने दिल्या असल्या तरी त्यातील निम्मेच सदनिकाधारक संबंधित गॅसचा वापर करतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एमएनजीएलची जोडणी पोहचलेली आहे, त्या ठिकाणी काही स्कीम एमएनजीएलच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. त्या स्कीमचा देखील ग््रााहकांनी फायदा घ्यावा तसेच एखाद्या सोसायटीतील फ्लॅटधारकांना कनेक्शन हवे असेल तर त्या सोसायटीपर्यंत एमएनजीएल त्यांच्या खर्चाने पाइपलाइन घेऊन जाते. त्यामुळे अशा फायदेशीर गॅसकनेक्शनसाठी आता सोसायट्यांनी पुढे येण्याचे आवाहन देखील एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले आहे.

साडेपाच हजार सुरक्षित ठेव

एमएनजीएलचे कनेक्शन घेण्यासाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन अर्ज करता येतो. कनेक्शन घेण्यासाठी कागदपत्रांबरोबरच डिपॉझिट रक्कम म्हणून साडेपाच हजार रुपये घेण्यात येतात. संबंधित रक्कम एकदाच भरू शकतात किंवा दर दोन महिन्यांनी बिल आल्यानंतर पाचशे रुपये अधिक बिल, अशी रक्कम ग््रााहकांकडून गोळा केली जाते. ज्या वेळी ग््रााहक कनेक्शन बंद करतो त्या वेळी संबंधित रक्कम त्यांना परत देण्यात येते.

एलपीजीपेक्षा अधिक सुरक्षित

एमएनजीएलचा गॅस हा हवेपेक्षा हलका आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आहे. हा गॅस थेट पाइपद्वारे असल्यामुळे शक्यतो लीक होत नाही आणि जरी झाला तरी हवेतच विरघळून जातो. एलपीजी सिलिंडरमधील गॅस हा हवेपेक्षा जड असल्यामुळे तो घरात लीक झाल्यास इतरत्र पसरतो. त्यामुळे लीक झाल्यानंतर दुर्घटनेचा मोठा धोका निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT