पुणे मेट्रोत गुदमरण्याची चिंता नाही; मेट्रोत आहेत इमर्जन्सी एक्झिट Pudhari
पुणे

Pune Metro: पुणे मेट्रोत गुदमरण्याची चिंता नाही; मेट्रोत आहेत इमर्जन्सी एक्झिट

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी सुरक्षितच; मुंबईच्या मोनोरेल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रावण हर्डीकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंबईच्या मोनोरेलप्रमाणे वीजपुरवठा बंद पडून अनेक प्रवाशांचा श्वास कोंडला, तशाच प्रकारे मेट्रो बंद पडली तर? घाबरू नका. मेट्रो बंद पडली तर पुरेशी हवा येण्याची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याची चोख सुरक्षाव्यवस्था पुण्याच्या मेट्रोत आहे.

मुंबई मोनोरेल बंद पडण्याची घटना नुकतीच घडली. त्यात जवळपास साडेतीनशे प्रवासी अडकले होते. मोनोरेल बंद पडल्यामुळे अनेक प्रवासी गुदमरले. त्यांना काचा फोडून बाहेर काढावे लागले. दिवसभर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. (Latest Pune News)

त्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडे चौकशी केली असता मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, मेट्रो ट्रेन मध्येच बंद पडली तर प्रवाशांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व व्यवस्था सुरक्षा मानांकनानुसार करण्यात आलेली आहे. त्यामुळे यासारख्या कोणत्याही घटनेत मेट्रो प्रवाशांना कसलाही त्रास होणार नाही.

सुरक्षा प्रणाली...

  • मेट्रोत व्हेंटिलेशन प्रणाली

  • इमर्जन्सी एक्झिट

  • ट्रॅकवर प्रवाशांना उतरवता येते, त्यावरून चालत स्थानकापर्यंत आणता येते

  • शिवाय गाडी लगेच जवळच्या स्थानकावर ‘टो’ करून नेता येते

  • दुसरी मेट्रो ट्रेन बोलावून शिफ्ट करताही येते अन् त्यांना स्थानकावर पोहचवता येते

  • ट्रेनला आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजे आहेत

मेट्रो रेल सेफ्टीच्या मानांकनानुसार पुणे मेट्रोमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली तरी त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईतील मोनोरेलप्रमाणे पुणे मेट्रोत घटना घडली, तर प्रवाशांना सुरक्षेच्या मानांकनानुसार असलेल्या इव्हॅक्युएशन प्रणालीद्वारे तत्काळ बाहेर काढता येते. मेट्रो ट्रेनला इमर्जन्सी एक्झिट आहेत. त्याद्वारे प्रवाशांना गाडीतून उतरवून व्हायाडक्टद्वारे जवळच्या स्थानकांवर पोहचविता येऊ शकते. याशिवाय गाडीला लगेच ‘टो’ करून (दुसर्‍या गाडीला जोडून ओढून घेऊन जाणे) जवळच्या मेट्रो स्थानकावर नेता येते. तसेच, आमच्याकडील आपत्कालीन यंत्रणा 24 तास सज्ज असते. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक (आयएएस), महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT