पुणे: गेल्या तीन वर्षांत मेट्रोतून 8 कोटी 23 लाख 26 हजार 272 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे महामेट्रो प्रशासनाला 128 कोटी 80 लाखांचे उत्पन्न मिळाल आहे. मेट्रोतून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च 2022 ते जुन 2025 या कालावधीपर्यंत तब्बल 8 कोटी 23 लाख 26 हजार 272 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे.
या कालावधीत पुणे मेट्रोला 128 कोटी 80 लाख 986 रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावरून पुणेकरांमध्ये मेट्रोची वाढती लोकप्रियता आणि सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. (Latest Pune News)
पुणे मेट्रो बनतेय नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग जानेवारी 2025 पर्यंत प्रवाशांची संख्या 49 लाख 66 हजारांवर पोहोचली होती आणि महसूल 7 कोटी 87 लाख रुपयांवर गेला.
सर्वात ताज्या आकडेवारीनुसार, जून 2025 मध्ये 52 लाख 42 हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला, यातून मेट्रोला 8 कोटी 33 लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. ही आकडेवारी पुणे मेट्रो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असल्याचे अधोरेखित करते.
प्रवाशांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ
मेट्रोने सुरुवातीच्या काळात, म्हणजेच मार्च 2022 मध्ये 5 लाख 14 लाख प्रवासी आणि 76 लाख रुपये महसूल नोंदवला होता. त्यानंतरच्या काळात सुरुवातीला काही चढ-उतार दिसून आले असले तरी, जानेवारी 2024 पासून प्रवाशांच्या संख्येत आणि महसुलात सातत्यपूर्ण वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
जानेवारी 2024 मध्ये 17 लाख 39 हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर महसूल 2 कोटी 62 लाख रुपये होता. त्यानंतरच्या महिन्यात हे आकडे वाढतच गेले.जुलै 2024 मध्ये 31 लाख 20 हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि मेट्रोला 4 कोटी 98 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.