

पुणे: राज्यस्तरीय शिखर सहकारी संस्था असलेल्या येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (2025 ते 2030) संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी रविवारी (दि.27) मतदान होत आहे. राज्यातील 12 विभागात एकूण 14 मतदार केंद्रांवर मतदान होईल. पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी 9 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर 12 संचालकांच्या जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात आहेत.
संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. विभागनिहाय स्थिती मतदार संख्या पाहता कोकण विभागात 69, मुुंबई 1205, पुणे 363, कोल्हापूर 222, सातारा 68, नाशिक 45, अहिल्यानगर 228, धुळे 114, अमरावती 124, छत्रपती संभाजीनगर 63, लातुर 118, नागपूर 196 मिळून एकूण मतदार 2788 आहेत. (Latest Pune News)
मुंबईत तीन मतदान केंद्रे आहेत. तर निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.29) महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वसंतदादा पाटील सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप हे काम पाहत आहेत.