पुणे: श्रावण महिना गुरुवारपासून (दि. १३) सुरू होत असल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढू लागली आहे. शहर, उपनगरांसह जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांकडून शेंगदाणा, साबुदाणा, गूळ आणि साखरेची खरेदी वाढली आहे. वाढत्या मागणीचा परिणाम भावावरही दिसून येत असून, शेंगदाण्याच्या भावात किलोमागे ५ ते ७ रुपये, साबुदाण्यात २ रुपये, तर गुळाच्या भावात १ ते दीड रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे तेजीतील भावही कायम आहेत. श्रावण सुरू झाल्यानंतर या वस्तूंच्या मागणीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्पादन क्षेत्रातील भाववाढीचा परिणाम गव्हाच्या बाजारावर झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या अर्थात भारी ज्वारीलाही मागणी असून, तिच्या भावात किलोमागे एक रुपयाची तेजी नोंदविण्यात आली आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल असल्याने तांदूळ, बाजरी, खाद्यतेल, विविध डाळी, बेसन, रवा, आटा, मैदा, भगर आणि नारळाच्या भावात मोठा बदल झालेला नाही. या वस्तूंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारभाव पुढीलप्रमाणे:
साखर (प्रतिक्विंटल) ५०००-५१०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) : - शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २४००-३२००, सरकी तेल २२५०-२७५०, सोयाबीन तेल २२००-२६००, पामतेल २२००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५५०, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २२७०-२६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४३००-४६००, मसुरी ३५००-३७००, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७२००, लचकारी कोलम ७३००-७८००, चिन्नौर ७७००-८२००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५९००-६७००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५२००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी :- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु.
गूळ :- गूळ नं. १ ५००० ते ५१००, गूळ नं.२ ४८५० ते ४९५०, गूळ नं.३ ४७०० ते ४८००, बॉक्स ५००० ते ६००० रु. डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७७००-७८००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७४००-७५००, मटकीडाळ ९०००-९२००, उडीदडाळ १००००-१३००० रु. कडधान्ये:-हरभरा ७६००-७८००, हुलगा ६६००-७६००, चवळी ८३००-१०७००, मसूर ७५००-८२००, मूग ९३००-१२४००, मटकी गावरान १५५००-१७५००, मटकी पॉलिश ९०००-९५००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ८५००-८८००, मटकी सेलम १७५००-१८८००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ५०००-५२००, काबुली चणा ८०००-११४०० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७५००, साबुदाणा नं.२ ७३००, साबुदाणा नं.३ ७००० रु. वरई भगर :-२००००-२१५००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३५०००-४०००० रु.शेंगदाणा :- जाडा ११५००-१२७००, स्पॅनिश–१४०००-१५०००, घुंगरु १३०००-१४५०० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६५०-१७५०, रवा १७००-१८००, मैदा १७००-१८००, बेसन :- (५० किलोस) ४२००-४६५० रु.
गुळाची आवक पूर्ववत; साखरेचे तेजीतील भाव कायम
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईनंतर काही काळ गुळाची आवक कमी झाली होती. मात्र, आता आवक पूर्ववत झाली असून मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज सुमारे ७० ते ८० टन गूळ दाखल होत आहे. आवक समाधानकारक असली तरी श्रावणासह आगामी सणांमुळे गुळाला मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गुळाच्या भावात किलोमागे १ ते दीड रुपयांची वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीची खरेदी वाढल्यास गुळाची उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे गूळ व्यापारी शशांक हापसे यांनी सांगितले. साखरेच्या बाजारातील तेजी कायम आहे.