Jaggery Pudhari
पुणे

Pune Market Yard Jaggery Prices: पुणे मार्केट यार्डात गूळ, साखर आणि शेंगदाणे महागले; वारीपूर्वी किराणा बाजारात तेजीची चिन्हे

गुळाच्या भावात किलोमागे दीड ते दोन रुपयांची वाढ; साखर-गव्हालाही तेजी, वारी आणि श्रावणामुळे बाजारातील उलाढाल वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रंग किंवा साखरेची भेसळ न करता पारंपरिक पद्धतीने गुळाचे उत्पादन सुरू झाल्याने या गुळाची बाजारात आवक वाढू लागली आहे. मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात गुळाची आवक वाढली असली, तरी ती मागणीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात घाऊक बाजारात गुळाच्या भावात किलोमागे दीड ते दोन रुपयांची वाढ झाल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

बाजारात मागणी वाढल्याने साखर आणि गव्हाच्या भावातही किलोमागे प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्याच्या दरात किलोमागे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मार्केट यार्डातील भुसार बाजारात अद्याप अपेक्षित प्रमाणात ग्राहकांची गर्दी नसल्याने व्यवहार संथ आहेत. त्यामुळे साबुदाणा, भगर, सर्व प्रकारच्या डाळी, गहू वगळता इतर अन्नधान्य, खाद्यतेल, बेसन आणि नारळाच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही मोठा बदल झालेला नाही. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील आठवड्यात शहरात वारीचे आगमन होणार असल्याने बाजारातील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर श्रावण महिन्यातील सण-उत्सवांमुळे किराणा मालाच्या मागणीत आणखी वाढ होऊन बाजारातील व्यवहारांना वेग येण्याची अपेक्षा आहे.

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४२५०-४३०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २३००-३१००, सरकी तेल २१५०-२६००, सोयाबीन तेल २१५०-२६००, पामतेल २१५०-२४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५००, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २०५०-२५५० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ३७००-४२००, मसुरी ३२५०-३५००, सोना मसूरी ५२००-७५००, एच.एम.टी. कोलम ५९००-६२००, लचकारी कोलम ६७००-७५००, चिन्नौर ६५००-७०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४२५०-४५००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२००-३७००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४४५०, मिलबर ३०००-३०५० रु.

ज्वारी :- गावरान नं. १ ५७००-६५००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५१००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४६५०-४८००, गूळ नं.२ ४५००-४६२५, गूळ नं.३ ४४००-४४७५, बॉक्स ४६००-५६०० रु. डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७३००-७५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७५००-७६००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२००० रु. कडधान्ये:-हरभरा ७१००-७५००, हुलगा ६६००-७२००, चवळी ७८००-१०२००, मसूर ७५००-८२००, मूग ९२००-१२०००, मटकी गावरान १५०००-१७०००, मटकी पॉलिश ८७००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम १७५००-१८५००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ४८००-५२००, काबुली चणा ७६००-११००० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु.

गोटा खोबरे ३७०००-३९००० रु. शेंगदाणा :- जाडा ११५००-१३०००, स्पॅनिश–१४०००-१५०००, घुंगरु १३०००-१४००० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६००-१६५०, रवा १६५०-१७५०, मैदा १६५०-१७५०, बेसन:- (५० किलोस) ३९००-४६५० रु. मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १७००-१८५०, मद्रास ४६००-४८००, पालकोल जुना २१००-२३००, सापसोल ३५००-५००० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT