Pune Police Extortion Case: फरासखाना पोलिसांवर खंडणीचा गुन्हा; बुधवार पेठेत तरुणांकडून २ हजार रुपये उकळल्याचा आरोप

कारवाईची धमकी देत ऑनलाइन पैसे घेतल्याचा आरोप; सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर प्रकरण उघड
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: फरासखाना पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत फिरण्यासाठी आलेल्या तिघा तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन या दोघा पोलिसांनी एका महिलेच्या फोन पेवर ऑनलाइन दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. हे दोघे पोलिस २९ जुलै रोजी नाकाबंदी कर्तव्यावर होते. त्या वेळी हा प्रकार घडला. विवेक पाटील आणि राहुल दाभाडे अशी खंडणीखोर पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Extortion News
Pune Crime: स्वारगेट बसस्थानकावर महिला व मुलीकडे अश्लील वर्तन; ४९ वर्षीय व्यक्तीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हॉटेलमध्ये मीटरचे काम करतो. २९ जुलै रोजी तो त्याच्या दोन मित्रांसोबत शनिवारवाडा पाहण्यासाठी पुण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र पायी बुधवार पेठजवळील लक्ष्मी रस्त्याला आले. त्या वेळी रस्त्यावर पोलिस नाकाबंदी करून तपासणी करीत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास तिघे बुधवार पेठेतील एटीएम गल्लीतून पायी चालत घराकडे निघाले होते. त्या वेळी पोलिस कर्मचारी विवेक पाटील आणि राहुल दाभाडे हे दोघे एका दुचाकीवर आले. त्यांनी या तिघांना थांबविले. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली.

Extortion News
Maharashtra Highway Public Convenience Centers: राज्य महामार्गांवर आधुनिक जनसुविधा केंद्रांची उभारणी; पीडब्ल्यूडीच्या प्रकल्पाला गती

तिघांनी आपल्या मोबाईलमधील आधार कार्ड दाखविले. दोघा पोलिसांनी फिर्यादीसह तिघांचे मोबाईल फोन काढून घेऊन त्यांना सांगितले की, "तुमच्यावर आता केस होईल व तुम्हाला कोर्टात न्यावे लागेल." त्या वेळी फिर्यादी तरुण म्हणाला, "आमची काही चूक नाही, तर आम्हास कशाला कोर्टात घेऊन जाणार तुम्ही?" दोघा पोलिसांनी त्यांच्याकडे प्रत्येकी पाच हजार रुपये अशी 15 हजार रुपयांची मागणी केली. त्या वेळी फिर्यादी त्यांना म्हणाला "आमचेकडे एवढे पैसे नाहीत, आम्ही आमच्या मित्राकडून तुम्हाला दोन हजार रुपये ऑनलाइन मागवून देऊ शकतो." त्या वेळी त्यातील एका पोलिसाने तरुणाला त्याच्या दुचाकी गाडीवर बसवून बुधवार पेठेत घेऊन गेला.

Extortion News
Pune Illegal Hookah Raid: कोंढव्यातील पिसोळी फार्महाऊसवर छापा; बेकायदा हुक्का विक्रीवर कारवाई, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यानंतर तेथील त्याच्या ओळखीच्या एका महिलेला त्याच्या वतीने पैसे स्वीकारण्यासाठी त्याने तिचा क्यूआर कोड स्कॅनर देण्यास सांगितले. त्या महिलेने तिच्या मोबाईलमधील पेटीएमचा क्यूआर कोड स्कॅनर दिला. त्या क्यूआर कोड स्कॅनरचा फोटो तरुणाने काढून तो काम करीत असलेल्या हॉटेलच्या शेठला पाठवून अडचणीत असल्याचे सांगून दोन हजार रुपये पाठवून देण्यास सांगितले. पैसे महिलेच्या खात्यात जमा झाल्याची खात्री करून याबाबत कोणाला काही सांगायचे नाही, अशी तंबी देऊन तिघांना सोडून दिले.

Extortion News
Pune Colleges Election Literacy Club: पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत ‘निवडणूक साक्षरता क्लब’ स्थापन करण्याचे निर्देश

असा आला प्रकार उजेडात

हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने कॅब बुक केली होती. प्रवास करीत असताना त्यांनी त्या कॅबच्या चालकाला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्या कॅबचालकाने एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर येत असताना याबाबत खात्री केली. तरी या दोघा पोलिसांनी या तरुणांकडून दोन हजार रुपये उकळण्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news