Pune Fish Market Prices: पुण्यात मासळीची आवक निम्म्यावर; चिकन महागले, इंग्लिश अंड्यांच्या दरात घसरण

पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद असल्याने मासळीचा पुरवठा कमी; पापलेट-सुरमईचे दर किंचित घसरले, तर चिकनच्या भावात किलोमागे १० रुपयांची वाढ
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथून सध्या मासळीची आवक सुरू असून, पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी मात्र पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे बाजारात मासळीचा पुरवठा नेहमीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे.

Fish
Pune Rain Red Alert: पुण्यात रेड अलर्ट; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

मागणीही मर्यादित असल्याने पापलेट आणि सुरमईच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित घट झाली असली, तरी भाव अद्यापही नेहमीपेक्षा जास्त आहेत. अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध नसल्याचे चित्र मासळी बाजारात दिसून येत आहे.

Fish
Pune Police Extortion Case: फरासखाना पोलिसांवर खंडणीचा गुन्हा; बुधवार पेठेत तरुणांकडून २ हजार रुपये उकळल्याचा आरोप

वातावरणात गारठा वाढल्याने चिकनला मागणी वाढली आहे. बाजारात पक्ष्यांच्या पुरवठा कमी पडल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. याउलट, मागणीच्या तुलनेत मुबलक पुरवठा होत असल्याने इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे दहा रुपयांनी घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा कायम असल्याने मटण आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर होते. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ५) खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची नाममात्र आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली.

Fish
Pune Crime: स्वारगेट बसस्थानकावर महिला व मुलीकडे अश्लील वर्तन; ४९ वर्षीय व्यक्तीला अटक

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १३००-१४००, लहान : ११००-१२००, भिला : ८००-९००, हलवा : ८००-१०००, सुरमई ८००-१४००, रावस : ११००-११००, घोळ : १२००-१३००, करली : ५००-५५०, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : ४००-६००. कोळंबी : लहान : ३०-३५०, मध्यम : ४००-६००, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १२००-१५००, किंग प्रॉन्स : ६००-८००, लॉबस्टर : १५००-१७००, मोरी : ५००-६००, राणीमासा : ३५०, खेकडे : ४००-४५०, चिंबोर्‍या : ६००-७००. खाडीची मासळी - तांबोशी : ५५०-६००, पालू :३००-३५०, लेपा : ३००-३५०, बांगडा : ३००-३५०, बेळुंजी : १६०-२००, तिसर्‍या : २५०-३००, तारली : २५०-३००.

Fish
Maharashtra Highway Public Convenience Centers: राज्य महामार्गांवर आधुनिक जनसुविधा केंद्रांची उभारणी; पीडब्ल्यूडीच्या प्रकल्पाला गती

नदीतील मासळी:

रहू : १४०-१८०, कतला : १८०-२००, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १००-१५०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २७०, लेगपीस ३३०, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३७०. अंडी : गावरान (शेकडा) ११६० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७१०, डझन ९६, प्रतिनग ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news