पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात सध्या सर्व प्रकारच्या फुलांची आवक नियमित आहे. प्रजासत्ताक दिन आणि रथसप्तमीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सुट्या फुलांना वाढलेली मागणी रविवारी (दि. 1) घटून पूर्वपदावर आली.
त्यामुळे या फुलांचे वाढलेले दरही आता निम्म्यावर आले आहेत. मात्र, शोभिवंत फुलांचे दर टिकून असल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे:
झेंडू : 10-30, गुलछडी : 40-60, ॲष्टर : जुडी 6-10, सुट्टा 50-70, कापरी : 20-50, शेवंती : 40-70, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 15-25, गुलछडी काडी : 20-50, डच गुलाब (20 नग) : 150-300, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 150-180, शेवंती काडी 200-350, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 500-600, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-10, जिप्सोफिला : 300-500, लीली बंडल : 8-10.