मृत महेश गायकवाड. Pudhari
पुणे

Pune Crime News : श्रावणात मटण मागितल्याने बापाने केला मुलाचा खून; पुरावे नष्ट करणाऱ्या आईलाही अटक

नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या, माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Pune Crime News Son Murdered Over Mutton

पुणे, पुढारी वृत्तसेवा : येथील वारजे माळवाडी परिसरात आज (दि.२७) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रावण महिन्यात जेवणात मटण मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका निर्दयी बापाने स्वतःच्या ३० वर्षीय मुलाचा खून केला. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या आईला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुलाला बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबात श्रावण महिन्यातील मांसाहाराच्या मागणीवरून वाद पेटला. मुलगा महेश याने श्रावण महिन्यात जेवणासाठी मटणाची मागणी केली होती. "तू श्रावणात मटण का मागितलेस?" या कारणावरून पिता-पुत्रामध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात बापाने महेशला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत महेशचा जागीच मृत्यू झाला.

आईने केली पुरावे नष्ट करण्यास मदत

आपल्याच मुलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर बापाने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, जन्मदात्या आईने नवऱ्याला पाठिंबा देत हत्येचे पुरावे नष्ट करण्यात मदत केली. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. माहितीमधील विसंगतीवरून पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपींना केली अटक

मुलाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत, तर हत्येचे पुरावे नष्ट करून गुन्ह्यात सहभाग दर्शवल्याबद्दल आईलाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर आणि वारजे माळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT