BJP vs NCP Pudhari
पुणे

Pune Legislative Council Election: पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत तणाव; भाजप आमदारांचा ठाम दावा

मुख्यमंत्र्यांकडे भेट घेऊन भाजपची आग्रही मागणी; अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याने राजकीय उत्कंठा शिगेला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग््रेास आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच शहर आणि जिल्ह्यातील भाजप आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग््राही मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल, असे स्पष्ट केले.

पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच तणाव निर्माण झाला आहे. भाजपने या जागेवर दावा केल्यानंतर राष्ट्रवादीने आमच्याकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याचे सांगत या जागेवर हक्क सांगितला. त्यामुळे अद्याप पुण्याची जागा नक्की कोणाकडे जाणार, यासंबंधीचे चित्र अस्पष्ट आहे.

त्यातच भाजपच्या सर्व आमदारांनी शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग््राही भूमिका घेतली आहे.

आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. दरम्यान, आमदारांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी या जागेसाठी आपण आग््राही आहोत. मात्र, आपली युती आहे. युतीत जागा सुटणे महत्त्वाचे असून, यासंबंधीचा निर्णय दिल्लीत होईल, असे सांगितले असल्याचे सांगण्यात आले.

पुणे आणि रायगड राष्ट्रवादीकडे?

महायुतीच्या विधान परिषदेच्या जागा वाटपात पुणे आणि रायगड या दोन जागा राष्ट्रवादी काँग््रेासकडे जाण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहील. तर, रायगडमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असून, त्यापाठोपाठ भाजप व तिसऱ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देऊन ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्यासंबंधीच्या हालचाली सुरू आहेत. या जागेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे इच्छुकआहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT