Land Records Pudhari
पुणे

Pune Land Records Office Restructuring: पुण्यात भूमी अभिलेखात मोठा बदल! नागरिकांना मिळणार झटपट सेवा, चार नवीन कार्यालयांची पुनर्रचना

सातबारा, प्रॉपर्टी कार्ड आणि मोजणीची कामे आता वेगाने होणार; महसूल विभागाच्या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर आणि हवेली तालुक्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या नागरीकरणामुळे जमीन मोजणी, सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांच्याशी संबंधित कामांचा ताण भूमी अभिलेख विभागावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. कामाचा हा वाढता ताण कमी करण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाने पुणे शहर नगर भूमापन व हवेली भूमी अभिलेख कार्यालयाची पुनर्रचना केली आहे.

नागरिकांना आपल्या हक्काच्या कामासाठी महिनोन्‌‍ महिने चकरा माराव्या लागत होत्या. हीच पार्श्वभूमी विचारात घेऊन महसूल विभागाने हा प्रशासकीय फेरबदल केला आहे. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 आणि नगर भूमापन अधिकारी क्रमांक 4 अशी दोन नवीन कार्यालये अस्तित्वात आली आहेत.

कार्यालयाचे नाव - सुधारित कार्यक्षेत्र

नगर भूमापन क्रमांक 1

या कार्यालयाच्या हद्दीत आता एकूण मिळकती 33 हजार 8 इतक्या असणार आहेत, तर कार्यक्षेत्र शनिवार पेठ, मुळा रोड, कर्वेनगर, एरंडवणे, भांबुर्डा, पाषाण, औंध, बोपोडी, हिंगणे खुर्द, धनकवडी, कोथरूड.

नगर भूमापन क्रमांक 2

या कार्यालयाच्या हद्दीत आता एकूण मिळकती 40 हजार 100 इतक्या असणार आहेत, तर कार्यक्षेत्र गणेश पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, शुक्रवार पेठ, कात्रज, कोंढवे खुर्द, वानवडी, हडपसर, मुंढवा, घोरपडी, येरवडा, कळस, धानोरी, लोहगाव.

नगर भूमापन क्रमांक 3

या कार्यालयाच्या हद्दीत आता एकूण मिळकती 65 हजार 237 इतक्या असणार आहेत, तर कार्यक्षेत्र बाणेर, बालेवाडी, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, वारजे, शिवणे, नांदेड, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, नऱ्हे, धायरी, किरकटवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, येवलेवाडी, कोंढवे बुद्रुक, पिसोळी, उंड्री, महंमदवाडी.

नगर भूमापन क्रमांक 4

या कार्यालयाच्या हद्दीत आता एकूण मिळकती 80 हजार 693 इतक्या असणार आहेत, तर कार्यक्षेत्र बोपखेल, दिघी, चऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव, निरगुडी, वडगाव शिंदे, वाघोली, खराडी, वडगाव शेरी, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी, वडमुखवाडी, चोवीसवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT